फॅटी लिव्हरचा धोका कमी करायचाय? मग हे ३ पदार्थांचा करा आहारात समावेश - डॉ. सौरभ सेठींचा सल्ला

आपल्या शरीरातील नको असलेले घटक बाहेर काढण्यासाठी आणि अन्न पचवण्यासाठी लिव्हर मदत करते. पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत असंतुलित आहार, ताण, जंक फूड, पाण्याची कमतरता आणि हालचालींचा अभाव यामुळे लिव्हरवर मोठा ताण येतो.
फॅटी लिव्हरचा धोका कमी करायचाय? मग हे ३ पदार्थांचा करा आहारात समावेश - डॉ. सौरभ सेठींचा सल्ला
फॅटी लिव्हरचा धोका कमी करायचाय? मग हे ३ पदार्थांचा करा आहारात समावेश - डॉ. सौरभ सेठींचा सल्ला
Published on

शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. आपल्या शरीरातील नको असलेले घटक बाहेर काढण्यासाठी आणि अन्न पचवण्यासाठी लिव्हर मदत करते. पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत असंतुलित आहार, ताण, जंक फूड, पाण्याची कमतरता आणि हालचालींचा अभाव यामुळे लिव्हरवर मोठा ताण येतो.

या कारणांमुळे फॅटी लिव्हर, यकृतदाह, फायब्रोसिस आणि अगदी कॅन्सर सारखे आजार उद्भवू शकतात. लिव्हर हे एक सायलेंट डिसीज ऑर्गन आहे. आजार झाला तरी लवकर लक्षणे दिसून येत नाहीत. म्हणूनच लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. याबद्दलच डॉक्टर सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे..

१. ग्रीन टी - लिव्हरसाठी नैसर्गिक डिटॉक्स

सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि लिव्हर डिटॉक्स होते.

फॅटी लिव्हरचा धोका कमी करायचाय? मग हे ३ पदार्थांचा करा आहारात समावेश - डॉ. सौरभ सेठींचा सल्ला
तुम्हीही दुपारपर्यंत झोपता? सावध रहा, तज्ज्ञांचा इशारा - आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते ही सवय!

ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन्स हे घटक लिव्हरचे एन्झाइम सुधारतात आणि चरबीचा साठा कमी करतात.

दररोज एक कप ग्रीन टीचा समावेश केल्याने पचनक्रिया सुधारते आणि फॅटी लिव्हरचा धोका कमी होतो.

२. कॉफी - फॅटी लिव्हरपासून बचाव

डॉ. सेठी सांगतात, कॉफीचे मर्यादित सेवन लिव्हरसाठी फायदेशीर ठरते.

कॉफी बनवताना साखरेऐवजी मध, स्टेव्हिया किंवा मॉन्क फ्रूट सारखे नैसर्गिक स्वीटनर वापरावेत.

यामुळे लिव्हरमधील फायब्रोसिस आणि सूज कमी होऊन जाते.

पण लक्षात ठेवा, कॉफीचे अतिसेवन टाळणे आवश्यक आहे.

३. बीट ज्यूस - नैसर्गिक डिटॉक्सिफायर

दररोज सकाळी एक ग्लास बीट ज्यूस प्यायल्याने लिव्हरमधील विषारी घटक बाहेर पडतात.

बीटामध्ये असलेले बेटालेन्स अँटिऑक्सिडंट्स लिव्हरच्या पेशींचे संरक्षण करतात आणि चरबीचे प्रमाण कमी करतात.

हा ज्यूस शरीरातील डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया वाढवतो आणि ऊर्जा पातळी सुधारतो.

आरोग्यासाठी सोपे बदल

  • तळलेले, तेलकट पदार्थ टाळा

  • पुरेसं पाणी प्या

  • रोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा व्यायाम करा

फॅटी लिव्हरचा धोका कमी करायचाय? मग हे ३ पदार्थांचा करा आहारात समावेश - डॉ. सौरभ सेठींचा सल्ला
अंड्याचा पिवळा भाग की पांढरा भाग अधिक फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचं स्पष्ट मत
  • मद्यपान आणि धूम्रपान टाळा

डॉ. सौरभ सेठी यांच्या म्हणण्यानुसार, नियमितपणे या नैसर्गिक आणि सहज पचणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास लिव्हर निरोगी राहते आणि लिव्हर संबंधित आजार दूर राहतात.

logo
marathi.freepressjournal.in