Dry Fruits Benefits : बदाम, अक्रोड अन् इतर ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात...

वेगवेगळ्या प्रकारच्या सुकामेव्याचे सेवन योग्य वेळी केल्यास त्यातील पोषक घटकांचा फायदा मिळण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया कोणता सुकामेवा कधी खावा.
Dry Fruits Benefits : बदाम, अक्रोड अन् इतर ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात...
Dry Fruits Benefits : बदाम, अक्रोड अन् इतर ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात...'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता यांसारखा सुकामेवा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि शरीराला आवश्यक असणारे चांगले फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रोजच्या आहारात सुकामेव्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, कोणता सुकामेवा दिवसाच्या कोणत्या वेळी खावा, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि डॉ. सौरभ सेठी यांनी याबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मते, वेगवेगळ्या प्रकारच्या सुकामेव्याचे सेवन योग्य वेळी केल्यास त्यातील पोषक घटकांचा फायदा मिळण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया कोणता सुकामेवा कधी खावा.

१. सकाळी नाश्त्याच्या वेळी खा बदाम

दिवसाची सुरुवात बदाम खाऊन करणे फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, सकाळी नाश्त्याच्या वेळी बदाम खाणे योग्य आहे. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, फायबर आणि मॅग्नेशियम असते. हे घटक रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात. तसेच बदामातील चांगले फॅट्स मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे एकाग्रता आणि मानसिक सतर्कता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

२. दुपारच्या जेवणासोबत खा पिस्ता आणि काजू

दुपारच्या जेवणासोबत किंवा जेवणानंतर पिस्ता आणि काजू खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पिस्त्यामध्ये वनस्पतीजन्य प्रथिने आणि प्रीबायोटिक फायबर असते. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत होते आणि जेवणानंतर लगेच भूक लागण्याची शक्यता कमी होऊ शकते. तर काजूमध्ये झिंक आणि लोह असते. हे घटक शरीरातील चयापचय प्रक्रिया, पेशींचे कार्य आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचे आहेत.

Dry Fruits Benefits : बदाम, अक्रोड अन् इतर ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : रोज वर्कआउट करूनही सतत थकवा जाणवतोय? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

३. सकाळच्या नाश्त्यानंतर खा पाइन नट्स

सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण यांच्यामधील वेळेत भूक लागल्यास पाइन नट्स खाऊ शकता. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये पिनोलेनिक ॲसिड नावाचे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असते. हे भूक नियंत्रित ठेवण्यास आणि शरीरातील चरबीच्या चयापचय प्रक्रियेला मदत करू शकते. त्यामुळे मधल्या वेळेत खाण्यासाठी पाइन नट्स हा एक पर्याय ठरू शकतो.

४. संध्याकाळी खा अक्रोड

अक्रोड खाण्यासाठी संध्याकाळची वेळ योग्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अक्रोडामध्ये अल्फा लिनोलेनिक ॲसिड (ALA) नावाचे ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते. हे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. याशिवाय अक्रोडामध्ये मेलाटोनिनचे प्रमाणही अल्प असते. मेलाटोनिन हे झोपेचे चक्र नियंत्रित करणारे हार्मोन आहे. त्यामुळे संध्याकाळी अक्रोड खाल्ल्याने शरीराला आराम मिळण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते.

Dry Fruits Benefits : बदाम, अक्रोड अन् इतर ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : रोज पुरेशी झोप घेत नाही? शरीरावर होतात 'हे' गंभीर परिणाम; तज्ज्ञ सांगतात...

५. शेंगदाणे दिवसभरात कधीही खाऊ शकता

शेंगदाणे खाण्यासाठी दिवसातील एखादी ठराविक वेळ पाळण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण किंवा संध्याकाळचा नाश्ता अशा कोणत्याही वेळी शेंगदाणे खाऊ शकता. त्यामध्ये रेस्व्हेराट्रोल आणि नियासिन यांसारखे घटक असतात. हे घटक रक्तवाहिन्यांचे आरोग्य आणि मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Dry Fruits Benefits : बदाम, अक्रोड अन् इतर ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात...
Money Saving Tips : दिवाळीत भरमसाठ खर्च झाला? आता पैसे वाचवण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

सुकामेवा खाताना योग्य वेळेकडेही द्या लक्ष!

बदाम, पिस्ता, काजू, अक्रोड आणि इतर सुकामेवा पोषक घटकांचा चांगला स्रोत आहेत. मात्र, कोणता सुकामेवा कधी खावा, याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या सूचना लक्षात घेता येतील. सकाळी बदाम, दुपारी पिस्ता-काजू, मधल्या वेळेत पाइन नट्स आणि संध्याकाळी अक्रोड असा आहारात समावेश करता येऊ शकतो. मात्र, सुकामेवा खाताना प्रमाणाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्याच्या स्थितीनुसार आणि आहाराच्या गरजेनुसार योग्य प्रमाण ठरवण्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)