बाजारातील मिठाई विसराल! घरच्या घरी बनवा दुधी भोपळ्याचा स्वादिष्ट कलाकंद

दुधी भोपळ्यापासून बनवा मऊ, स्वादिष्ट आणि पौष्टिक कलाकंद. कमी साहित्यामध्ये घरच्या घरी तयार होणारी ही सोपी मिठाई चवीसोबत आरोग्याचीही काळजी घेते. जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी.
बाजारातील मिठाई विसराल! घरच्या घरी बनवा दुधी भोपळ्याचा स्वादिष्ट कलाकंद
बाजारातील मिठाई विसराल! घरच्या घरी बनवा दुधी भोपळ्याचा स्वादिष्ट कलाकंद
Published on

गोड खायची इच्छा झाली की अनेकजण बाजारातील मिठाईकडे वळतात. मात्र घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तयार होणारा आणि चवीसोबतच पौष्टिकताही देणारा पर्याय शोधत असाल, तर दुधी भोपळ्याचा कलाकंद नक्की करून पाहा. दुधी भोपळा म्हटलं की भाजी डोळ्यासमोर येते, पण याच दुधीपासून तयार होणारी ही मिठाई इतकी स्वादिष्ट लागते की घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच तिचे चाहते होतील.

दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. यासोबतच फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए यांसारखे महत्त्वाचे पोषक घटकही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ही मिठाई चवदार असण्यासोबतच शरीरासाठीही फायदेशीर ठरते.

बाजारातील मिठाई विसराल! घरच्या घरी बनवा दुधी भोपळ्याचा स्वादिष्ट कलाकंद
तुम्ही खाताय आईस्क्रिम की फ्रोजन डेझर्ट? पॅकेटवरील 'ही' माहिती नक्की वाचा

साहित्य

  • २ कप किसलेला दुधी भोपळा

  • १ कप मावा (खवा)

  • अर्धा कप साखर

  • २ टेबलस्पून तूप

  • अर्धा टीस्पून वेलची पूड

  • ८ ते १० बदाम आणि पिस्ते (बारीक कापलेले)

  • २ टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस (ऐच्छिक)

कृती :

सर्वप्रथम दुधी भोपळा स्वच्छ धुवून सोलून घ्या. त्यातील बिया काढून बारीक किसून घ्या.

यानंतर जाड बुडाच्या कढईत तूप गरम करा. त्यामध्ये किसलेला दुधी घालून मध्यम आचेवर सुमारे १० ते १५ मिनिटे परता. दुधी मऊ झाल्यानंतर त्यात साखर घाला.

साखर वितळल्यानंतर मिश्रणातून पाणी सुटेल. हे पाणी पूर्णपणे आटेपर्यंत शिजवत राहा. त्यानंतर त्यात मावा घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत सतत हलवत राहा.

मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यामध्ये वेलची पूड आणि इच्छेनुसार सुक्या खोबऱ्याचा किस घाला. सर्व साहित्य नीट मिसळल्यानंतर मिश्रण कढईच्या कडा सोडू लागेल.

आता गॅस बंद करून तयार मिश्रण तुपाचा हात लावलेल्या ट्रे किंवा ताटात समान पसरवा. वरून बदाम आणि पिस्त्याचे काप भुरभुरवा.

मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आवडीच्या आकारात तुकडे कापून सर्व्ह करा.

बाजारातील मिठाई विसराल! घरच्या घरी बनवा दुधी भोपळ्याचा स्वादिष्ट कलाकंद
भजी-कटलेटला द्या सुट्टी; ट्राय करा रताळ्याचे प्रोटीनयुक्त ठेचा कबाब, वेट लॉससाठी हेल्दी स्नॅक

चव आणखी वाढवण्यासाठी काही टिप्स

  • अधिक रिच चव हवी असल्यास माव्याचे प्रमाण थोडे वाढवा.

  • साखरेऐवजी गूळ वापरल्यास वेगळी आणि नैसर्गिक गोडी मिळू शकते.

  • कलाकंद अधिक मऊ हवा असल्यास थोडे कंडेन्स्ड मिल्क घालू शकता.

  • सर्व्ह करण्यापूर्वी काही वेळ फ्रिजमध्ये ठेवल्यास चव आणखी खुलते.

घरच्या घरी सहज तयार होणारा हा दुधीचा कलाकंद गोड खाण्याची इच्छा पूर्ण करतो आणि पौष्टिकताही देतो. एखाद्या खास प्रसंगी किंवा कुटुंबासोबतच्या गोड क्षणांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.

logo
marathi.freepressjournal.in