चष्म्यावर स्क्रॅच? टेन्शन नको, सोप्या टिप्स फॉलो करा, नवीनच दिसेल तुमचा चष्मा

दैनंदिन वापरात कितीही सांभाळलं तरी चष्मा पुसताना, टेबलावर ठेवताना किंवा बॅगेत टाकताना त्यावर हलकेफुलके स्क्रॅच पडतातच. आणि मग त्यातून दिसायलाही त्रास, शिवाय 'आता नवीन चष्मा घ्यावाच लागेल' अशी वेळ येते. पण थांबा...
चष्म्यावर स्क्रॅच? टेन्शन नको, सोप्या टिप्स फॉलो करा, नवीनच दिसेल तुमचा चष्मा
Published on

दैनंदिन वापरात कितीही सांभाळलं तरी चष्मा पुसताना, टेबलावर ठेवताना किंवा बॅगेत टाकताना त्यावर हलकेफुलके स्क्रॅच पडतातच. आणि मग त्यातून दिसायलाही त्रास, शिवाय 'आता नवीन चष्मा घ्यावाच लागेल' अशी वेळ येते. पण थांबा! नवीन चष्म्यासाठी खिसा रिकामा करण्याआधी हे घरगुती आणि सोपे उपाय नक्की वापरून बघा.

स्क्रॅच काढण्यासाठी सोप्या टिप्स :

  • टूथपेस्ट - घरात ठेवलेली टूथपेस्ट घ्या, मऊ कपड्यावर थोडी लावून स्क्रॅचच्या जागेवर हलकेच चोळा. काही वेळाने धुऊन पुसा, फरक जाणवेल.

  • बेकिंग सोडा पेस्ट - थोडा बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा, स्क्रॅच असलेल्या भागावर लावा आणि मऊ कपड्याने स्वच्छ करा.

चष्म्यावर स्क्रॅच? टेन्शन नको, सोप्या टिप्स फॉलो करा, नवीनच दिसेल तुमचा चष्मा
ऑफिसमध्ये क्लासी दिसायचंय? मग 'हे' Color Combination नक्की ट्राय करा
  • कार विंडशील्ड रिप्लेन्ट - कारच्या काचा स्वच्छ करण्यासाठी वापरला जाणारा रिप्लेन्ट चष्म्यावर हलक्या हाताने लावल्यास स्क्रॅच कमी दिसतात.

  • फ्रीज ट्रिक - चष्मा काही तास फ्रीजमध्ये ठेवा, नंतर त्यावर जमलेला बर्फ काढताना सूक्ष्म स्क्रॅचही फिके होतील.

( टीप - हे उपाय करताना चष्म्याचा लेन्स प्रकार लक्षात घ्या; अँटी-ग्लेअर किंवा खास कोटिंग असलेले लेन्स असल्यास हे उपाय जरा जपूनच करा. )

तर मग, पुढच्यावेळी चष्म्यावर स्क्रॅच दिसले, की थेट ऑप्टिकल दुकानात न जाता हे सोपे घरगुती उपाय वापरून बघा आणि आपला चष्मा पुन्हा नव्यासारखा करा!

logo
marathi.freepressjournal.in