वाफ की बर्फ? त्वचेसाठी कोणता उपाय जास्त फायदेशीर; जाणून घ्या योग्य स्किनकेअरचा फॉर्म्युला

चेहऱ्याला वाफ द्यावी की बर्फाचा शेक घ्यावा? त्वचेसाठी कोणता उपाय अधिक फायदेशीर आहे, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. जाणून घ्या फेस स्टीमिंग आणि फेस आयसिंगचे फायदे, योग्य वापराची पद्धत आणि तुमच्या स्किन टाइपनुसार कोणता पर्याय अधिक योग्य ठरू शकतो.
वाफ की बर्फ? त्वचेसाठी कोणता उपाय जास्त फायदेशीर; जाणून घ्या योग्य स्किनकेअरचा फॉर्म्युला
वाफ की बर्फ? त्वचेसाठी कोणता उपाय जास्त फायदेशीर; जाणून घ्या योग्य स्किनकेअरचा फॉर्म्युला'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

चमकदार, स्वच्छ आणि निरोगी त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण महागडी उत्पादने वापरतात. मात्र काही सोपे घरगुती उपायही त्वचेची काळजी घेण्यासाठी तितकेच प्रभावी ठरू शकतात. यामध्ये चेहऱ्याला वाफ देणे आणि बर्फाचा शेक घेणे हे दोन लोकप्रिय पर्याय आहेत. सोशल मीडियावरही हे दोन्ही उपाय मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. पण त्वचेसाठी नेमकं काय योग्य आहे, हा प्रश्न अनेकांना पडतो.

खरं तर वाफ आणि बर्फ या दोन्ही पद्धतींचे फायदे वेगवेगळे आहेत. त्वचेचा प्रकार, समस्या आणि अपेक्षित परिणाम यानुसार योग्य पर्याय निवडणे गरजेचे असते. योग्य पद्धतीने वापरल्यास दोन्ही उपाय त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात.

वाफ की बर्फ? त्वचेसाठी कोणता उपाय जास्त फायदेशीर; जाणून घ्या योग्य स्किनकेअरचा फॉर्म्युला
Health Tips : महागड्या स्किन केअरला विसरा! ‘या’ फ्रूट जेलीमुळे मिळेल नैसर्गिक ग्लो

बर्फाचा शेक कधी फायदेशीर ठरतो?

चेहऱ्यावर थंडावा देण्यासाठी आणि त्वचेला झटपट फ्रेश लूक मिळवून देण्यासाठी बर्फाचा शेक उपयुक्त मानला जातो.

  • चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी- डोळ्यांखालील पफीनेस किंवा सकाळी उठल्यानंतर दिसणारी सूज कमी करण्यासाठी बर्फाचा शेक मदत करू शकतो.

  • त्वचेला झटपट ताजेपणा मिळवण्यासाठी - थंडाव्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा अधिक फ्रेश आणि उजळ दिसू शकतो.

  • मुरुमांचा त्रास कमी करण्यासाठी - त्वचेतील दाह आणि लालसरपणा कमी करण्यासाठी थंड शेक उपयोगी ठरतो.

  • मेकअपपूर्वी - मेकअप अधिक स्मूथ आणि टिकाऊ दिसण्यासाठी अनेकजण मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ फिरवतात.

वाफ की बर्फ? त्वचेसाठी कोणता उपाय जास्त फायदेशीर; जाणून घ्या योग्य स्किनकेअरचा फॉर्म्युला
Hair Care Tips : केस गळणे, कोंडा आणि कोरडेपणाला कंटाळलात? फक्त दह्याचा ‘हा’ उपाय केसांना देईल नैसर्गिक चमक

चेहऱ्याला वाफ का द्यावी?

वाफेचा उपयोग त्वचेची सखोल स्वच्छता करण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकलेली घाण बाहेर पडण्यास मदत होते.

  • डीप क्लिनिंगसाठी - चेहऱ्यावरील छिद्रे मोकळी होऊन त्वचा अधिक स्वच्छ होण्यास मदत मिळते.

  • ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी करण्यासाठी- नाकाभोवती किंवा हनुवटीवर जमा झालेले ब्लॅकहेड्स काढणे सोपे होते.

  • कोरड्या त्वचेसाठी- मर्यादित प्रमाणात वाफ घेतल्याने त्वचेला हायड्रेशन मिळण्यास मदत होऊ शकते.

दोन्हीपैकी सर्वोत्तम पर्याय कोणता?

त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, या दोन्ही पद्धतींचा योग्य क्रमाने वापर करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

  • सर्वप्रथम काही मिनिटे वाफ घ्या.

  • त्यानंतर फेसपॅक किंवा सीरम लावा.

  • शेवटी हलक्या हाताने बर्फाचा शेक द्या.

यामुळे त्वचेची स्वच्छता झाल्यानंतर छिद्रे पुन्हा आकुंचन पावण्यास मदत होते आणि त्वचा अधिक ताजीतवानी दिसू शकते.

वाफ की बर्फ? त्वचेसाठी कोणता उपाय जास्त फायदेशीर; जाणून घ्या योग्य स्किनकेअरचा फॉर्म्युला
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? घरच्या घरी बनवा 'राइस जेल'; त्वचेला मिळेल नैसर्गिक ग्लो

या गोष्टी लक्षात ठेवा

  • बर्फ थेट त्वचेवर जास्त वेळ ठेवू नका.

  • वाफ खूप गरम नसावी.

  • संवेदनशील त्वचा असल्यास कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

  • आठवड्यातून १ ते २ वेळा वाफ घेणे पुरेसे असते.

त्वचेची काळजी घेताना कोणताही ट्रेंड आंधळेपणाने फॉलो करण्याऐवजी आपल्या त्वचेची गरज ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे. योग्य पद्धतीने वाफ आणि बर्फाचा वापर केल्यास त्वचा अधिक स्वच्छ, तजेलदार आणि निरोगी दिसू शकते.

(Disclaimer : या लेखातील माहिती ही सर्वसाधारण आरोग्यविषयक माहितीनुसार देण्यात आली आहे.‘नवशक्ति’ या माहितीच्या अचूकता किंवा परिणामकारकतेची हमी देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

logo
marathi.freepressjournal.in