Ganeshotsav 2026 : कानवल्याला मुरड घालता येत नाही? 'ही' सोपी ट्रिक वापरा, काठ दिसेल एकदम सुंदर

गणपतीच्या नैवेद्यासाठी मोदकांसोबत केला जाणारा पारंपरिक कानवला सुंदर मुरडीत कसा तयार करायचा? जाणून घ्या अगदी सोपी पद्धत.
Ganeshotsav 2026 : कानवल्याला मुरड घालता येत नाही? 'ही' सोपी ट्रिक वापरा, काठ दिसेल एकदम सुंदर
Ganeshotsav 2026 : कानवल्याला मुरड घालता येत नाही? 'ही' सोपी ट्रिक वापरा, काठ दिसेल एकदम सुंदर'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

गणपतीच्या नैवेद्यात मोदकांसोबत केला जाणारा कानवला हा अनेक घरांमधील पारंपरिक पदार्थ आहे. करंजीसारखा दिसणारा हा पदार्थ चवीला जितका छान, तितकाच त्याला योग्य मुरड घालणं काहींना अवघड जातं. कानवल्याचा काठ नीट बंद करण्यासाठी कोणताही साचा किंवा चमचा लागत नाही; हातानेच त्याला सुंदर मुरड दिली जाते. सुरुवातीला ही पद्धत थोडी कठीण वाटू शकते, पण योग्य पद्धत समजली की कानवले छान आकारात तयार करता येतात.

Ganeshotsav 2026 : कानवल्याला मुरड घालता येत नाही? 'ही' सोपी ट्रिक वापरा, काठ दिसेल एकदम सुंदर
बाजारातील मिठाई विसराल! घरच्या घरी बनवा दुधी भोपळ्याचा स्वादिष्ट कलाकंद

कानवल्याला मुरड कशी घालायची?

सारण भरून कानवला तयार केल्यानंतर त्याच्या दोन्ही कडा एकमेकांवर ठेवून हलक्या हाताने दाबून बंद करा. आता एका टोकापासून मुरड घालायला सुरुवात करा. काठाचा थोडासा भाग बोटांनी आतल्या बाजूला वळवून दाबा. त्यानंतर त्याच पद्धतीने पुढचा भाग आत वळवत दाबत जा.

एकेक छोटा भाग वळवत पुढे गेल्यावर कानवल्याच्या संपूर्ण काठाला छान मुरड मिळेल. शेवटचा भागही व्यवस्थित दाबून बंद करा. सुरुवातीला सरावासाठी एखादा कानवला करून पाहा. हात बसल्यानंतर बाकीच्या कानवल्यांना सहज आणि एकसारखी मुरड घालता येईल.

गणपतीच्या नैवेद्यासाठी यंदा मोदकांसोबत सुंदर मुरड घातलेले पारंपरिक कानवले नक्की करून पाहा.

logo
marathi.freepressjournal.in