डायबेटिज, ब्लड प्रेशरसह कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं की हृदयासंबंधित आजार होऊ लागतात. बॅड कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करायचं असेल तर किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी वापरला जाणारा 'लसूण' हा पदार्थ उपयोगी ठरू शकतो. तेव्हा बॅड कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी लसूण नेमका कशा पद्धतीने खावा तसेच त्याच्या सेवनाने कोणते फायदे मिळतात इत्यादी जाणून घेऊयात.
हृदयाच्या आरोग्यासाठी लसूण फायदेशीर :
लसूण हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. लसूण खाल्ल्याने हृदय निरोगी राहतं. आयुर्वेदानुसार जर लसूण आणि गूळ या दोन्ही पदार्थांचं कॉम्बिनेशन करून खाल्ल्यास अधिक फायदे मिळतात.
कसे करावे सेवन?
जर तुम्हाला वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर एका वाटीत सोललेलं लसूण घ्या. मग यात एक चमचा गुळाची पावडर मिक्स करा आणि एकत्र मिश्रण तयार करा. लसूण आणि गुळापासून तयार झालेली ही चटणी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली ठरते. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते.
रिकाम्या पोटी खा चटणी :
दररोजच्या आहारात तुम्ही लसूण आणि गुळाच्या चटणीचा समावेश करू शकता. ही चटणी खाल्ल्यावर पाणी प्या. लसूण आणि गुळाचे कॉम्बिनेशन हे औषधी गुणांनी भरपूर असते. याच्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये येतेच पण त्यासोबतच पोटाशी संबंधित आजार सुद्धा बरे होतात. तसेच या दोन्ही गोष्टींच्या कॉम्बिनेशनमुळे त्वचा सुद्धा निरोगी राहते.
कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी या गोष्टींचा करा समावेश :
दररोज सकाळी ओट्सचं सेवन करू शकता. तसेच रोजच्या आहारात हिरव्या भाज्या जसे मेथी, पालक, कोथिंबीर, पुदिना इत्यादींचे सेवन करून शकता ज्यामुळे तुमचं आरोग्य अगदी ठणठणीत राहील. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नट्स, बदाम, अखरोड इत्यादींचा सुद्धा आहारात समावेश करा.
तसेच फक्त आहारात बदल करून चालणार नाही तर जीवनशैलीमध्ये सुद्धा महत्वपूर्ण बदल करणं कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी आवश्यक असतं. दररोज व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी 'नवशक्ती' जबाबदार नसेल.)