हिवाळ्यात प्या गरमागरम हिरव्या मुगाचे सूप; रेसिपी देखील अगदी सोपी, वाचा फायदा काय?

हिरव्या मुगाचे गरमागरम सूप हे शरीराला उब देणारे, पचनाला हलके आणि ताकद वाढवणारे आहे. प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक घटकांनी भरलेले हे सूप हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
हिवाळ्यात प्या गरमागरम हिरव्या मुगाचे सूप; रेसिपी देखील अगदी सोपी, वाचा फायदा काय?
हिवाळ्यात प्या गरमागरम हिरव्या मुगाचे सूप; रेसिपी देखील अगदी सोपी, वाचा फायदा काय?
Published on

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णता आणि अतिरिक्त ऊर्जेची गरज असते. थंडीमुळे सर्दी, खोकला, अशक्तपणा आणि पचनाच्या तक्रारी वाढू शकतात. अशा वेळी आहारात गरम आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे फार महत्त्वाचे ठरते. हिरव्या मुगाचे गरमागरम सूप हे शरीराला उब देणारे, पचनाला हलके आणि ताकद वाढवणारे आहे. प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक घटकांनी भरलेले हे सूप हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

हिवाळ्यात प्या गरमागरम हिरव्या मुगाचे सूप; रेसिपी देखील अगदी सोपी, वाचा फायदा काय?
आजीचा असरदार उपाय! हळदीचं दूध हिवाळ्यात कसं बदलतं आरोग्य? वाचा सविस्तर

हिरव्या मुगाचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी

साहित्य:

  • हिरवे मूग

  • आलं

  • लसूण

  • जिरे

  • हिरवी मिरची

  • मीठ

  • कोथिंबीर

  • तूप

कृती:

हिरव्या मुगाचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटीभर हिरवे मूग रात्रभर पाण्यात भिजत घालावेत. सकाळी उठल्यानंतर त्यातील पाणी काढून मूग स्वच्छ धुवून घ्यावेत. कुकरमध्ये हे मूग, हिरवी मिरची, जिरे, आलं आणि लसूण टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालावे. कुकरला पाच ते सहा शिट्या देऊन मूग चांगले मऊ शिजवून घ्यावेत.

मूग शिजल्यावर ते मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट तयार करावी. त्यानंतर एका टोपामध्ये तूप गरम करून त्यात ही पेस्ट टाकावी आणि नीट ढवळावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून सूप तयार करावे. शेवटी चवीनुसार मीठ आणि वरून कोथिंबीर घालून गरमागरम सूप सर्व्ह करावे.

हिवाळ्यात प्या गरमागरम हिरव्या मुगाचे सूप; रेसिपी देखील अगदी सोपी, वाचा फायदा काय?
रोजचे पोहे-उपमा सोडा; मुलांसाठी नाश्त्यात बनवा चवदार स्प्रिंग रोल्स!

हिरव्या मुगाचे सूप आरोग्यासाठी का फायदेशीर?

हिरव्या मुगामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे पोषक घटक शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. तसेच मुगाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. हिवाळ्यात सतत होणाऱ्या सर्दी-खोकल्यावरही गरम मुगाचे सूप उपयुक्त ठरते.

logo
marathi.freepressjournal.in