आजीचा असरदार उपाय! हळदीचं दूध हिवाळ्यात कसं बदलतं आरोग्य? वाचा सविस्तर

हळद नैसर्गिक अँटीबायोटिक असल्याने बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगसचा प्रभाव कमी होतो. हिवाळ्यात रोज एक ग्लास प्यायल्यावर रोगप्रतिकारक शक्ती इतकी वाढते की सर्दी-खोकला सहज जवळ येत नाही.
आजीचा असरदार उपाय! हळदीचं दूध हिवाळ्यात कसं बदलतं आरोग्य? वाचा सविस्तर
Published on

थंडीच्या दिवसांत आई-आजी सांगत आलेला एक साधा पण परिणामकारक घरगुती उपाय आजही तितकाच उपयोगी ठरतो - गरम हळदीचं दूध. शरीराला आतून बळ देणारं, सर्दी–खोकला दूर ठेवणारं आणि दिवसभरातील थकवा कमी करणारं हे पेय हिवाळ्यात सर्वात जास्त फायदेशीर मानलं जातं. रोज एक ग्लास प्यायल्यावर शरीरात उर्जा टिकून राहते, पचन सुधारतं आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ‘ग्लो’ही दिसू लागतो.

हळद दुधाचे ७ जबरदस्त फायदे

हिवाळ्यात हळद दूध पिण्याचे फायदे खूप मोठे आहेत. त्यापैकी महत्त्वाचे फायदे असे–

१) हृदय मजबूत आणि निरोगी

हळदीतील कर्क्युमिन रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी करतं, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतं आणि हृदयविकारांचा धोका कमी करतो. हृदय तरुण आणि निरोगी राहण्यासाठी हळद दूध अत्यंत उपयुक्त.

२) साखरेची पातळी नियंत्रित

डायबिटीज किंवा प्री-डायबिटीज असणाऱ्यांसाठी हळद दूध उत्तम पर्याय. ते इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतं आणि ब्लड शुगर स्टेबल ठेवतं.

आजीचा असरदार उपाय! हळदीचं दूध हिवाळ्यात कसं बदलतं आरोग्य? वाचा सविस्तर
'हेल्दी' समजून कच्चे पदार्थ खाताय? न्यूट्रिशनिस्टनी दिला इशारा

३) सर्दी-खोकला दूर, इम्युनिटी अपग्रेड

हळद नैसर्गिक अँटीबायोटिक असल्याने बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगसचा प्रभाव कमी होतो. हिवाळ्यात रोज एक ग्लास प्यायल्यावर रोगप्रतिकारक शक्ती इतकी वाढते की सर्दी-खोकला सहज जवळ येत नाही.

४) पचन सुधारतं, पोट हलकं राहातं

गॅस, ऍसिडिटी, ब्लोटिंग किंवा IBS चा त्रास असेल तर हळद दूध पचनक्रिया सुधारतं. रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्यावर सकाळी पोट स्वच्छ राहातं.

५) हाडं भक्कम, सांधेदुखी कमी

दुधातील कॅल्शियम आणि हळदीतील जळजळ कमी करणारे गुण एकत्र येऊन हाडं मजबूत करतात. वयस्कर व्यक्ती आणि खेळाडू दोघांसाठीही हा पेय अत्यंत लाभदायक.

आजीचा असरदार उपाय! हळदीचं दूध हिवाळ्यात कसं बदलतं आरोग्य? वाचा सविस्तर
अननस : हिवाळा-उन्हाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे ‘सुपरफळ’; जाणून घ्या फायदे

६) शरीर आतून गरम राहातं

हळद दूध रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीराला आतून उब देते. खासकरून हात-पाय थंड पडण्याची समस्या असणाऱ्यांसाठी हिवाळ्यात हे सर्वोत्तम गरम पेय.

७) मेंदू तल्लख आणि स्मरणशक्ती वाढ

कर्क्युमिन मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होण्यास मदत करतं. त्यामुळे एकाग्रता वाढते आणि अल्झायमर–डिमेन्शियासारख्या आजारांचा धोका कमी होतो.

घरच्या घरी हळदीचं दूध कसं बनवायचं?

साहित्य :

  • १ ग्लास दूध (गायीचं / बादाम / सोया दूधही चालेल)

  • ½ चमचा हळद पावडर (ऑरगॅनिक असेल तर उत्तम)

  • चिमूटभर काळी मिरी (हळदीचा प्रभाव २००० पट वाढवते)

  • १ छोटा तुकडा आलं किस (ऐच्छिक)

  • ¼ चमचा दालचिनी पावडर (चवीसाठी)

  • खडीसाखर किंवा मध (गरजेनुसार)

आजीचा असरदार उपाय! हळदीचं दूध हिवाळ्यात कसं बदलतं आरोग्य? वाचा सविस्तर
Health benefits of milk and honey : दूध आणि मधाचे एकत्र सेवन करा अन् मिळवा हे ७ जबरदस्त फायदे

कृती :

१) एका पातेल्यात दूध मंद आचेवर गरम करा.
२) त्यात हळद पावडर, काळी मिरी, आलं आणि दालचिनी पावडर घाला.
३) हे मिश्रण २-३ मिनिटं हलक्या आचेवर उकळू द्या, जेणेकरून सगळे गुणधर्म एकजीव होतील.
४) गॅस बंद करून दूध थोडं गार होऊ द्या.
५) इच्छेनुसार खडसाखर किंवा मध मिसळा.
६) झोपण्यापूर्वी गरमागरम प्या.

logo
marathi.freepressjournal.in