जंक फूडला द्या हेल्दी ट्विस्ट; ट्राय करा पनीर पिझ्झाची सोपी रेसिपी

गव्हाच्या पिठाचा बेस, ताज्या भाज्या आणि प्रोसेस्ड चीजऐवजी पनीर वापरून तयार होणारा हा पिझ्झा चविष्ट तर लागतोच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो.
जंक फूडला द्या हेल्दी ट्विस्ट; ट्राय करा पनीर पिझ्झाची सोपी रेसिपी
जंक फूडला द्या हेल्दी ट्विस्ट; ट्राय करा पनीर पिझ्झाची सोपी रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

पिझ्झा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र बाहेर मिळणाऱ्या पिझ्झामध्ये मैदा, जास्त चीज आणि तेलकट पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणारे अनेकजण पिझ्झा खायला टाळतात. पण आता तुम्ही घरच्या घरी हेल्दी पनीर पिझ्झा तयार करू शकता. गव्हाच्या पिठाचा बेस, ताज्या भाज्या आणि प्रोसेस्ड चीजऐवजी पनीर वापरून तयार होणारा हा पिझ्झा चविष्ट तर लागतोच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो.

गव्हाच्या बेसमुळे ठरतो हेल्दी

या पिझ्झामध्ये मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा बेस वापरला जातो. त्यामुळे हा पिझ्झा अधिक पौष्टिक बनतो. त्यासोबत पनीर, मशरूम, ढोबळी मिरची आणि ऑलिव्ह्जसारख्या भाज्यांमुळे पिझ्झाची चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढतात.

साहित्य :

पिझ्झासाठी -

  • २ गव्हाच्या पिठाचे पिझ्झा बेस

  • १ कांदा (चिरलेला)

  • २०० ग्रॅम पनीर

  • १/२ ढोबळी मिरची

  • १/२ कप मशरूम

  • ७ ते ८ ऑलिव्ह्ज

  • १ टोमॅटो (चिरलेला)

  • शिजवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल

जंक फूडला द्या हेल्दी ट्विस्ट; ट्राय करा पनीर पिझ्झाची सोपी रेसिपी
झणझणीत आणि टेस्टी पेरी पेरी पनीर सँडविच; नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

पिझ्झा सॉससाठी -

  • २ कप टोमॅटो प्युरी

  • १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट

  • १ टीस्पून साखर

  • ७ ते ८ बेसिलची पाने

  • चवीनुसार मीठ

  • ओरगॅनो आणि रेड चिली फ्लेक्स

कृती :

पिझ्झा सॉस तयार करा

सुरुवातीला पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करा. त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. आता टोमॅटो प्युरी, साखर, बेसिलची पाने, मीठ, ओरगॅनो आणि रेड चिली फ्लेक्स घालून सॉस घट्ट होईपर्यंत शिजवा.

बेसवर सॉस लावा

तयार पिझ्झा बेसवर हा सॉस समान पसरवून घ्या.

भाज्यांचे टॉपिंग करा

आता त्यावर कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, मशरूम आणि ऑलिव्ह्ज घाला.

पनीर किसून घाला

शेवटी पनीर किसून संपूर्ण पिझ्झावर पसरवा.

पिझ्झा बेक करा

प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये पिझ्झा काही मिनिटे बेक करा. पनीर हलके सोनेरी दिसू लागल्यावर पिझ्झा बाहेर काढा.

जंक फूडला द्या हेल्दी ट्विस्ट; ट्राय करा पनीर पिझ्झाची सोपी रेसिपी
तेलकट स्नॅक्सला बाय-बाय! बनवा हेल्दी मसूर डाळ टिक्की, वाचा सोपी रेसिपी

टिप्स :

  • पिझ्झाची चव वाढवण्यासाठी ताज्या भाज्यांचा वापर करणे उत्तम.

  • प्रोसेस्ड चीजऐवजी पनीर वापरल्याने पिझ्झा अधिक हेल्दी बनतो.

  • रेड चिली फ्लेक्सचे प्रमाण आपल्या चवीनुसार कमी-जास्त करू शकता.

  • ओव्हन नसेल तर हा पिझ्झा झाकण ठेवून तव्यावरही तयार करू शकता.

logo
marathi.freepressjournal.in