भाज्या खायला नाक मुरडणाऱ्या मुलांसाठी परफेक्ट नाश्ता! १५ मिनिटांत तयार होणारा 'पौष्टिक' पराठा

मुलांना भाज्या दिसल्या की नाक मुरडायची सवय! पण याच भाज्या जर मजेशीर, रंगीत आणि कुरकुरीत पराठ्याच्या रूपात समोर आल्या, तर तेही आवडीने खातील.
भाज्या खायला नाक मुरडणाऱ्या मुलांसाठी परफेक्ट नाश्ता! १५ मिनिटांत तयार होणारा 'पौष्टिक' पराठा
भाज्या खायला नाक मुरडणाऱ्या मुलांसाठी परफेक्ट नाश्ता! १५ मिनिटांत तयार होणारा 'पौष्टिक' पराठा
Published on

सकाळच्या धावपळीत रोज नवे काय बनवायचं हा प्रश्न पडतोच. त्यात बऱ्याचदा मुलांना भाज्या दिसल्या की नाक मुरडायची सवय! पण याच भाज्या जर मजेशीर, रंगीत आणि कुरकुरीत पराठ्याच्या रूपात समोर आल्या, तर तेही आवडीने खातील. सकाळचा नाश्ता पौष्टिक असणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी ही झटपट बनणारी रेसिपी एकदम परफेक्ट.

भाज्या खायला नाक मुरडणाऱ्या मुलांसाठी परफेक्ट नाश्ता! १५ मिनिटांत तयार होणारा 'पौष्टिक' पराठा
मुलांना पालेभाज्या आवडत नाहीत? बनवा चविष्ट आणि कुरकुरीत पालक कटलेट

साहित्य :

  • किसलेली कोबी - अर्धा कप

  • चिरलेला कांदा - १

  • चिरलेला टोमॅटो - १

  • चिरलेल्या हिरव्या मिरच्या - २

  • चिरलेला लसूण - २ पाकळ्या

  • कोथिंबीर - आवश्यकतेनुसार

  • लाल तिखट - १ चमचा

  • धने पावडर - २ चमचे

  • जिरे पावडर - १ चमचा

  • मीठ - चवीनुसार

  • तांदळाचे पीठ - अर्धा कप

  • पाणी - आवश्यकतेनुसार

  • तेल - ४ ते ५ चमचे

  • चिली फ्लेक्स - २ ते ३ चमचे

भाज्या खायला नाक मुरडणाऱ्या मुलांसाठी परफेक्ट नाश्ता! १५ मिनिटांत तयार होणारा 'पौष्टिक' पराठा
'हेल्दी' समजून कच्चे पदार्थ खाताय? न्यूट्रिशनिस्टनी दिला इशारा

कृती :

एका मोठ्या बाऊलमध्ये सगळ्या भाज्या, मसाले आणि मीठ टाका. त्यात तांदळाचे पीठ मिसळा आणि थोडं थोडं पाणी घालत जाडसर मिश्रण तयार करा.

आता गरम तव्यावर एक चमचा तेल घाला आणि तयार मिश्रण पसरवून पॅनकेक/पराठ्याच्या आकारात बनवा. वरून चिली फ्लेक्स शिंपडा.

दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शिजवा आणि फोड येईपर्यंत कुरकुरीत भाजून घ्या.

बस्स! अगदी १५ मिनिटांत तयार होईल चवदार, कुरकुरीत आणि पौष्टिक भाज्यांचा पराठा.

गरम गरम चटणी, सॉस किंवा दह्यासोबत खाल्लात तरी मजा दुप्पट!

logo
marathi.freepressjournal.in