
उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हामुळे वेगवेगळ्या समस्या जाणतात. त्वचा जळणे, दाह निर्माण होणे, त्वचा लालसर पडणे, असे त्रास जाणवतात. उन्हात जाणे जरी टाळले तरी उकाड्यामुळे देखील काही त्रास संभवतात. काही लोकांना उन्हाळ्यात सातत्याने जळजळ किंवा आग होते. मेहंदी लावणे हा यावर चांगला उपाय ठरू शकतो. मेहंदी ही थंड गुणाची असल्याने तिचा उपयोग केला जाऊ शकतो. जाणून घ्या सविस्तर
मेहंदी
मेहंदी ही एक बहुगुणी वनस्पती आहे. मेहंदीचे शास्त्रीय नाव लॉसोनिया इनरमिस आहे. आग्नय आशिया आणि उत्तर आफ्रिका हे तिचे उगमस्थान असून राजस्थानमध्ये मेहंदीची लागवड केली जाते. मेहंदीचा उपयोग प्रामुख्याने धार्मिक सण, उत्सव किंवा लग्नसमारंभात हात आणि पायाचे सौंदर्य वाढवण्यासाठी होते. मात्र, मेहंदीचे उपयोग इतकेच मर्यादित नाही. मेहंदी ही बहुगुणी आहे तसेच बाह्यउपचार पद्धतीत मेहंदीचा उपयोग शतकांपासून सुरू आहे.
तळपायाची आग होत असेल तर मेहंदी पावडर पाण्यात भिजवून ती पेस्ट पायावर लावून ठेवावी. किमान दोन तास मेहंदी पूर्ण वाळेपर्यंत पाय धुवू नयेत किंवा रात्रीच्या वेळी मेहंदी पायांना लावावी आणि सकाळी पाय धुवावे. नियमित मेहंदी पायांना लावल्याने तळपायाची आग कमी कमी होत जाईल. मेहंदी ही वांतिकारक आणि कफोत्सारक असल्याने तळपायाची आग कमी करण्यात तिचा उपयोग होतो. तसेच त्वचेची दाहकता कमी करण्यास देखील उपयोग होतो.
हे ही वाचा -
पायांना सातत्याने घाम येत असेल तर त्यावरही मेहंदी लावणे फायदेशीर ठरते.
पायांच्या भेगा भरून काढण्यासाठी
पायांना भेगा पडणे ही खूप सामान्य समस्या आहे. जी अनेकांना भेडसावते. पायाच्या या भेगा भरून काढण्यासाठी पायांना मेहंदी लावणे फायदेशीर ठरते.
टाचा दुखणे
पायांच्या टाचा दुखत असल्यास पायांना दररोज मेहंदी लावल्याने टाचा दुखणे थांबते.
याशिवाय गळवे, जखमा, खरचटणे, भाजणे इत्यादींवरही मेहंदीची पेस्ट लावल्याने त्याचा उत्तम फायदे होतात.
मेहंदीच्या खोडाची साल ही कावीळ, प्लीहावृद्धी, त्वचा रोग इत्यादींवर उपयोगी असते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)