

उंच हिल्स म्हणजे आकर्षक लूकचा अविभाज्य भाग. पार्टी असो, ऑफिस असो किंवा कोणतंही स्टायलिश आउटफिट हिल्स प्रत्येक लूकला उठाव देतात. पण या परफेक्ट फॅशनच्या मागे शरीरावर सुरू असलेला ताण मात्र दिसत नाही. आणि याच गंभीर परिणामांबद्दल अमेरिकेतील मेरीलँडमधील डॉ. कुणाल सूद यांनी महिलांना स्पष्ट इशारा दिला आहे.
डॉ. सूद यांच्या मते, हिल्स घालत राहिल्याने शरीराची नैसर्गिक ठेवण (alignment) हळूहळू बदलते.
शरीराचं वजन पुढे सरकतं
सांध्यांवर अनैसर्गिक दाब पडू लागतो
गुडघ्यांच्या आतील भागावर जास्त ताण येतो
हा ताण वर्षानुवर्षं कायम राहिला तर cartilage झिजते आणि knee osteoarthritis (गुडघ्यांचा संधिवात) होण्याचा धोका झपाट्याने वाढतो.
हिल्समध्ये पाय सतत ‘टोकदार’ स्थितीत राहतात. त्यामुळे:
Achilles tendon म्हणजेच पायाच्या मागील बाजूस असलेला एक जाड आणि मजबूत स्नायूबंध छोटा आणि कडक होतो
calf muscles ताणलेले आणि संकुचित होतात
ankle चं लवचिकपण कमी होतं
फ्लॅट शूज घालणं अस्वस्थ वाटू लागतं
अनेक महिलांना वर्षानुवर्षं हिल्स वापरल्यानंतर सपाट सँडल्समध्ये चालायलाही त्रास होतो यामागचं खरं कारण हेच आहे.
हिल्सची उंची चालण्याची पद्धत पूर्णपणे बदलते.
पावलं लहान पडतात
चाल मंदावते
स्नायू वेगळ्या पद्धतीने काम करतात
शरीर या बदलांना सरावलं की, हिल्स न घातल्यावरही चालण्यात अडथळे जाणवतात. म्हणजे लूक परफेक्ट करण्यासाठी केलेली छोटीशी सवय दीर्घकालीन बदल निर्माण करू शकते.
हिल्स फक्त खास प्रसंगांसाठी वापरा
रोजच्या वापरासाठी आरामदायक, सपोर्टिव्ह फुटवेअर निवडा
नियमित कॅल्फ स्ट्रेचिंग, टाचेसाठी एक्सरसाइज करा
पायांना अधूनमधून रिलॅक्स पोजिशन्स द्या
हिल्स तुमचा लुक ग्लॅमरस करतात, पण शरीरावर होणारा ताण मात्र अदृश्य असतो. पुढच्या वेळी हिल्स निवडताना फक्त फॅशनवर नाही तर शरीराच्या संकेतांवरही लक्ष द्या.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)