वजन झपाट्याने कमी करायचंय? आजपासून आहारात 'या' ५ भाज्यांचा करा समावेश!

आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्रानुसार, काही भाज्यांमध्ये असे नैसर्गिक गुण असतात जे शरीरातील चरबी कमी करण्यात मदत करतात. या भाज्या पचनसंस्था मजबूत ठेवतात...
वजन झपाट्याने कमी करायचंय? आजपासून आहारात 'या' ५ भाज्यांचा करा समावेश!
Published on

वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. काही नियमित जिमला जातात, तर काही जेवणात पथ्य पाळतात. पण जर तुम्ही योग्य आहारावर लक्ष दिलंत, तर घरच्या घरीही लठ्ठपणावर नियंत्रण ठेवता येतं. आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्रानुसार, काही भाज्यांमध्ये असे नैसर्गिक गुण असतात जे शरीरातील चरबी कमी करण्यात मदत करतात. या भाज्या पचनसंस्था मजबूत ठेवतात, चयापचय (मेटाबॉलिझम) वाढवतात आणि आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवतात. त्यामुळे शरीर हलकं, ऊर्जायुक्त आणि फिट वाटतं.

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास वजन झपाट्याने कमी होऊ शकतं

१. काकडी

वजन झपाट्याने कमी करायचंय? आजपासून आहारात 'या' ५ भाज्यांचा करा समावेश!
फॅटी लिव्हरचा धोका कमी करायचाय? मग हे ३ पदार्थांचा करा आहारात समावेश - डॉ. सौरभ सेठींचा सल्ला

काकडी ही वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपी आणि प्रभावी भाजी आहे. त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरात हायड्रेशन टिकून राहतं आणि पचनक्रिया सुधारते. काकडी खाल्ल्याने पोट पटकन भरतं आणि अनावश्यक भूक कमी होते. त्यातील फायबर शरीरातील चरबी बाहेर टाकण्यास मदत करतं, ज्यामुळे वजन लवकर कमी होतं.

२. दुधी भोपळा

दुधी भोपळा म्हणजे लठ्ठपणावर उपाय करणारी ‘डिटॉक्स भाजी’. यात ९०% पाणी आणि भरपूर फायबर असतं, जे पचन सुधारतं आणि मेटाबॉलिझम वाढवतं. नियमित सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.

वजन झपाट्याने कमी करायचंय? आजपासून आहारात 'या' ५ भाज्यांचा करा समावेश!
तुम्हीही दुपारपर्यंत झोपता? सावध रहा, तज्ज्ञांचा इशारा - आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते ही सवय!

३. ब्रोकोली

ब्रोकोली म्हणजे प्रथिनांचा उत्तम स्रोत आणि कमी कॅलरीचं सुपरफूड! ते खाल्ल्याने जास्त वेळ पोट भरलेलं वाटतं आणि ओव्हरइटिंग होत नाही. त्यातील सूक्ष्म पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स वजन कमी करण्यास तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

४. पालक

पालक खाल्ल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि पचन सुधारतं. त्यात प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्याची प्रक्रिया वेगवान होते. तुम्ही पालकाचं सूप, स्मूदी किंवा सॅलडमध्ये समावेश करून हा हेल्दी पर्याय सहज वापरू शकता.

५. कोबी

वजन झपाट्याने कमी करायचंय? आजपासून आहारात 'या' ५ भाज्यांचा करा समावेश!
पोटावरील चरबीचा घेर होईल झपाट्याने कमी; फॉलो करा ‘या’ हेल्दी सवयी आणि टिप्स

कोबी ही कमी कॅलरी आणि जास्त फायबर असलेली भाजी आहे. ती कच्ची सॅलडमध्ये खाऊ शकता किंवा गरम सूप म्हणूनही वापरू शकता. तिचं नियमित सेवन केल्याने पचन सुधारतं आणि शरीरातील साठलेली चरबी कमी होते.

वजन कमी करण्यासाठी आहारात बदल हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. या पाच भाज्या दररोजच्या आहारात समाविष्ट केल्यास शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते आणि एकंदर आरोग्य सुधारतं. त्यासोबत पुरेसं पाणी, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेतल्यास वजन कमी करण्याची प्रक्रिया अधिक परिणामकारक ठरते.

(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in