डार्क अंडरआर्म्सना करा Bye Bye! घरच्या घरी करा 'हे' ३ सोपे उपाय

आपल्या सौंदर्यात चेहरा जितका महत्त्वाचा आहे, तितकाच आपल्या शरीराच्या इतर भागांची काळजी देखील गरजेची आहे. त्यातच एक विशेष भाग म्हणजे अंडरआर्म्स. अनेकदा आपण चेहऱ्यावर भरपूर लक्ष देतो, पण काखेच्या त्वचेची स्वच्छता आणि काळजी मागे राहते...
डार्क अंडरआर्म्सना करा Bye Bye! घरच्या घरी करा 'हे' ३ सोपे उपाय
Published on

आपल्या सौंदर्यात चेहरा जितका महत्त्वाचा आहे, तितकाच आपल्या शरीराच्या इतर भागांची काळजी देखील गरजेची आहे. त्यातच एक विशेष भाग म्हणजे अंडरआर्म्स. अनेकदा आपण चेहऱ्यावर भरपूर लक्ष देतो, पण काखेच्या त्वचेची स्वच्छता आणि काळजी मागे राहते. यामुळे काखेतील त्वचा काळवंडते, स्लीव्हलेस कपडे घालताना लाज वाटू शकते आणि दुर्गंधी देखील येऊ शकते.

अशावेळी केवळ महागड्या क्रीम्स किंवा क्लिनिक ट्रीटमेंटची गरज नाही. घरच्या घरी उपलब्ध सोप्या आणि नैसर्गिक उपायांनीही तुम्ही अंडरआर्म्स उजळ, मऊ आणि स्वच्छ ठेवू शकता.

डार्क अंडरआर्म्सना करा Bye Bye! घरच्या घरी करा 'हे' ३ सोपे उपाय
आरोग्यासाठी नाही, पण स्किनकेअरसाठी फायदेशीर! त्वचा मऊ आणि पोर्स क्लीन करण्यासाठी वापरा साखरेचा स्क्रब

अंडरआर्म्स काळे होण्याची मुख्य कारणे

  • केस काढण्यासाठी रेझर किंवा केमिकल क्रीम्सचा वापर

  • हार्मोनल बदल

  • खूप घट्ट कपडे घालणे

  • जास्त डिओडोरंट वापरणे

  • अंडरआर्म्स व्यवस्थित न स्वच्छ करणे

  • गरम मेण वापरणे

३ सोपे घरगुती उपाय

१. बेकिंग सोडा
घरच्या स्वयंपाकघरातले बेकिंग सोडा फक्त जेवणासाठी नाही, तर त्वचेवर काळा थर कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे. एका वाटीत बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट काखेत लावा, काही मिनिटांनी हलके स्क्रब करा आणि नंतर पाण्याने धुवा. तुम्ही हवी असल्यास नारळाच्या तेलात मिसळूनही वापरू शकता. आठवड्यातून दोनदा वापरल्यास अंडरआर्म्स उजळण्यास मदत होते.

डार्क अंडरआर्म्सना करा Bye Bye! घरच्या घरी करा 'हे' ३ सोपे उपाय
ग्लो हवाय? मग कॉस्मेटिक निवडताना 'ही' बेसिक चेकलिस्ट लक्षात ठेवा

२. बेसन-दह्याची पेस्ट
बेसन आणि दह्याचे मिश्रण त्वचेतील मृत पेशी काढते, रंग समान करते आणि त्वचा मऊ करते. ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावा, सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. काही दिवस दररोज वापरल्यास त्वचा नक्कीच उजळते.

३. बटाट्याचा रस
बटाटा फक्त स्वयंपाकात नव्हे, तर अंडरआर्म्सवरील काळा थर कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. बटाट्याचा रस किंवा बटाट्याचे तुकडे काखेत लावल्यास काही दिवसांत फरक जाणवतो. अधिक प्रभावासाठी बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळून लावू शकता.

टीप: या उपायांचा नियमित वापर केल्यास नैसर्गिक उजळ त्वचा मिळते. महागड्या क्रीम्सऐवजी घरगुती उपाय सुरक्षित, सोपे आणि परवडणारे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in