आरोग्यासाठी नाही, पण स्किनकेअरसाठी फायदेशीर! त्वचा मऊ आणि पोर्स क्लीन करण्यासाठी वापरा साखरेचा स्क्रब

साखरेचे बारीक दाणे त्वचेवरील मृत पेशी अलगद काढून टाकतात. साखरेमध्ये नैसर्गिकरित्या ग्लायकोलिक अॅसिडचे अंश असतात, जे त्वचा मऊ करण्यास आणि नैसर्गिक चमक वाढविण्यास मदत करतात.
आरोग्यासाठी नाही, पण स्किनकेअरसाठी फायदेशीर! त्वचा मऊ आणि पोर्स क्लीन करण्यासाठी वापरा साखरेचा स्क्रब
आरोग्यासाठी नाही, पण स्किनकेअरसाठी फायदेशीर! त्वचा मऊ आणि पोर्स क्लीन करण्यासाठी वापरा साखरेचा स्क्रब
Published on

साखर खाणं आरोग्यासाठी कधी कधी हानिकारक ठरू शकतं, पण हीच साखर तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? चेहरा मऊ, स्वच्छ आणि तजेलदार दिसण्यासाठी नियमित एक्सफोलिएशन म्हणजे मृत त्वचापेशी काढून टाकणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी घरच्या घरी करता येणारा साखरेचा स्क्रब हा अतिशय सोपा, किफायतशीर आणि प्रभावी उपाय आहे.

साखरेचा स्क्रब का फायदेशीर?

साखरेचे बारीक दाणे त्वचेवरील मृत पेशी अलगद काढून टाकतात. साखरेमध्ये नैसर्गिकरित्या ग्लायकोलिक अॅसिडचे अंश असतात, जे त्वचा मऊ करण्यास आणि नैसर्गिक चमक वाढविण्यास मदत करतात. योग्य पद्धतीने साखरेचा वापरल्यास त्वचेवरील पोर्स साफ होऊन चेहरा अधिक तजेलदार दिसतो.

आरोग्यासाठी नाही, पण स्किनकेअरसाठी फायदेशीर! त्वचा मऊ आणि पोर्स क्लीन करण्यासाठी वापरा साखरेचा स्क्रब
ग्लो हवाय? मग कॉस्मेटिक निवडताना 'ही' बेसिक चेकलिस्ट लक्षात ठेवा

कसा तयार कराल साधा साखरेचा स्क्रब?

  • २ चमचे पांढरी किंवा ब्राऊन साखर

  • १ चमचा नैसर्गिक तेल (खोबरेल, बदाम किंवा ऑलिव्ह ऑईल)

हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्यावर हलक्या हाताने गोलाकार हालचालीत २-३ मिनिटे मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. त्वचा लगेच मऊ आणि फ्रेश वाटेल.

त्वचेच्या प्रकारानुसार साखरेचे खास मिश्रण

१) कोरड्या त्वचेसाठी - साखर + मध

मध त्वचेला ओलावा देतो आणि सौम्य जंतुनाशक गुणधर्मही असतात. साखर आणि मध एकत्र करून तयार केलेला स्क्रब त्वचेला पोषण देतो आणि कोरडेपणा कमी करतो.

२) तेलकट त्वचेसाठी - साखर + लिंबूरस

लिंबामध्ये व्हिटॅमिन C असते, जे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करते. मात्र लिंबूरस मर्यादित प्रमाणातच वापरावा. स्क्रब केल्यानंतर लगेच उन्हात जाणे टाळावे, कारण त्वचा संवेदनशील होऊ शकते.

३) ग्लो आणि क्लिनिंगसाठी – साखर + कॉफी पावडर

हे मिश्रण त्वचा स्वच्छ करण्यासोबतच पोषणही देते. साधी, फ्लेवर नसलेली कॉफी वापरा. हे मिश्रण त्वचेवरील घाण काढून टाकते आणि त्वचेला मऊपणा देते.

आरोग्यासाठी नाही, पण स्किनकेअरसाठी फायदेशीर! त्वचा मऊ आणि पोर्स क्लीन करण्यासाठी वापरा साखरेचा स्क्रब
फळं, पानं नाही… बियांमध्ये दडलाय आरोग्याचा खजिना! पपईच्या बिया पचन आणि हृदयासाठी कशा फायदेशीर?

स्क्रब करताना घ्यायची काळजी

  • खूप जोरात चोळू नका; त्यामुळे सूक्ष्म जखमा होऊ शकतात.

  • आठवड्यातून १ ते २ वेळाच स्क्रब करा.

  • पिंपल्स किंवा संवेदनशील त्वचा असल्यास आधी छोट्या भागावर टेस्ट करा.

  • स्क्रब केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

शेवटी महत्त्वाचं काय?

साखरेचा स्क्रब हा घरच्या घरी करता येणारा नैसर्गिक आणि किफायतशीर उपाय आहे. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य घटक मिसळून वापरल्यास चेहरा अधिक स्वच्छ, मऊ आणि उजळ दिसू शकतो. मात्र कोणतीही गोष्ट मर्यादेतच नियमित पण नियंत्रित वापर हीच सुंदर त्वचेची खरी गुरुकिल्ली आहे.

logo
marathi.freepressjournal.in