सुंदर, दाट आणि निरोगी केसांसाठी अनेकजण महागडे शॅम्पू, हेअर केअर टुल्स किंवा पार्लर ट्रीटमेंट वापरतात. तरीही, अनेकदा अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. अशावेळी, घरच्या घरी बनवता येणारा कोरफडी शॅम्पू हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय ठरू शकतो.
कोरफडीमध्ये असलेले औषधी गुणधर्म केसांचे मुळापासून पोषण करतात. त्यातील अँटी-बॅक्टेरियल घटक डोक्यातील खाज आणि कोंडा कमी करण्यास मदत करतात, तर अँटीऑक्सिडंट्स केसांना लांब, मऊ आणि चमकदार बनवतात.
कोरफडी शॅम्पू कसा बनवायचा:
ताज्या कोरफडीच्या पानांपासून जेल काढा.
एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात थोडा साबण किंवा शॅम्पू घालून वितळवा.
त्यात एलोवेरा जेल, व्हिटॅमिन ई आणि जोजोबा तेल मिसळा.
मिश्रण चांगले एकसारखे होईपर्यंत हलवा आणि एका बाटलीत भरून ठेवा.
वापरण्यापूर्वी बाटली चांगली हलवायला विसरू नका.
कोरफडी शॅम्पूचे फायदे:
केसांची वाढ: एलोवेरातील व्हिटॅमिन्समुळे केस लवकर वाढतात.
खाज कमी होणे: अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म खाज आणि कोंडा कमी करतात.
मऊ व बाउंसी केस: नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे केस मऊ आणि बाउंसी होतात.
केस गळती कमी: केसांच्या मुळापासून पोषण होऊन गळती कमी होते.
घरच्या घरी बनवलेला हा शॅम्पू केवळ नैसर्गिकच नाही, तर केसांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे. रोजच्या रुटीनमध्ये कोरफडी शॅम्पूचा समावेश केल्यास केसांना नैसर्गिक ग्लोसह सुंदरता मिळते.