बाजारची कशाला? फक्त काही सोप्या स्टेप्समध्ये घरी तयार करा खमंग आणि कुरकुरीत मठरी

मठरी हा मैद्यापासून तयार होणारा खमंग आणि हलका स्नॅक आहे. चहासोबत त्याची चव अजून खुलून येते. अनेकदा आपण बाजारातून मठरी विकत घेतो, पण घरच्या घरी तयार केलेली मठरी ताजी, हलकी आणि खमंग असते. योग्य प्रमाणात साहित्य आणि सोप्या टिप्स वापरल्या तर मठरी अगदी हलवाईसारखी खुसखुशीत होते.
बाजारची कशाला? फक्त काही सोप्या स्टेप्समध्ये घरी तयार करा खमंग आणि कुरकुरीत मठरी
बाजारची कशाला? फक्त काही सोप्या स्टेप्समध्ये घरी तयार करा खमंग आणि कुरकुरीत मठरी
Published on

मठरी हा मैद्यापासून तयार होणारा खमंग आणि हलका स्नॅक आहे. चहासोबत त्याची चव अजून खुलून येते. अनेकदा आपण बाजारातून मठरी विकत घेतो, पण घरच्या घरी तयार केलेली मठरी ताजी, हलकी आणि खमंग असते. योग्य प्रमाणात साहित्य आणि सोप्या टिप्स वापरल्या तर मठरी अगदी हलवाईसारखी खुसखुशीत होते. ती टाइम पास साठी, हलक्या भुकेसाठी किंवा चहाच्या वेळेस एक उत्तम पर्याय ठरते.

घरच्या घरी मठरी बनवण्याची सोपी रेसिपी

बाजारची कशाला? फक्त काही सोप्या स्टेप्समध्ये घरी तयार करा खमंग आणि कुरकुरीत मठरी
खूप खाल्ले बटाटा अन् केळ्याचे चिप्स, आता ट्राय करा सुरणाचा कुरकुरीत स्नॅक; महिनाभर टिकतील, वाचा 'सीक्रेट रेसिपी'

साहित्य:

  • मैदा - २ कप

  • ओवा - १ छोटा चमचा

  • काळी मिरी - ½ चमचा (जाडसर कुटलेली)

  • कसुरी मेथी - १ मोठा चमचा

  • मीठ - चवीप्रमाणे

  • तेल किंवा तूप - ¼ कप

  • तळण्यासाठी तेल - आवश्यकतेनुसार

कृती:

एका मोठ्या परातीत मैदा चाळून घ्या. त्यात ओवा, कुटलेली काळी मिरी, कसुरी मेथी आणि मीठ मिसळा.

मळण्यासाठी तेल किंवा तूप घालून मैद्याला बोटांनी नीट मिसळा. हा टप्पा फार महत्त्वाचा आहे; योग्य मोयन असल्यास मठरी खुसखुशीत तयार होते.

थोडे-थोडे कोमट पाणी घालून घट्ट कणीक मळा. मळलेल्या कणिकेला १५–२० मिनिटे ओल्या कापडाने झाका.

कणीक मुरल्यानंतर लहान-लहान गोळे करा आणि हलकेच चपटे करा. लाटण्याची गरज नाही; किंचित असमान मठरी जास्त छान लागते.

कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. गॅस मंद करून मठरी सावकाश तेलात सोडा. मंद आचेवर तळल्यास मठरी आतूनही नीट शिजते आणि बाहेरून सोनेरी व खुसखुशीत होते.

मठरी दोन्ही बाजूंनी रंग आल्यावर काढून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.

बाजारची कशाला? फक्त काही सोप्या स्टेप्समध्ये घरी तयार करा खमंग आणि कुरकुरीत मठरी
मोजक्या साहित्यात अन् काहीच मिनिटांत तयार होणारे कुरकुरीत पोटॅटो बॉल्स; संध्याकाळच्या चहासाठी परफेक्ट स्नॅक

टीप

  • योग्य पद्धतीने साठविल्यास मठरी अनेक दिवस टिकते.

  • चहासोबत त्याची चव दुपटीने लागते.

  • घरची मठरी ताजी, हलकी आणि बाजारातील मठरीपेक्षा खमंग असते.

logo
marathi.freepressjournal.in