How To Decorate Ganesh Mandir At Home: यंदा ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. वर्षभर ज्या सणाची आतुरतेने सगळे वाट पाहत असतात ते बाप्पा अनेकांच्या घरी किंवा वेगवगेळ्या मंडळात स्थापन्न होणार आहेत. पौराणिक कथेनुसार, व्यासजींच्या सांगण्यावरून गणेशजींनी सलग १० दिवस एकाच ठिकाणी बसून महाभारत लिहिले. या कारणास्तव दरवर्षी १० दिवस गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि १० व्या दिवशी पूजा केल्यानंतर गणपती विसर्जन केले जाते. गणपतीच्या सणाची सगळीकडेच जोरदार तयारी सुरु आहे. तुमच्या घरीही बाप्पाचे आगमन होणार असेल आणि अजूनही तुम्ही काय डेकोरेशन करायचे हे ठरवले नसेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या आयडिया घेऊन आलो आहोत. चला लास्ट मिनिट आयडिया कोणत्या आहेत ते बघूयायत.
> रंगीत कागदाची सजावट
शाळेत शिकवलेल्या कलेचा वापर करून तुम्ही घरीच रंगीत कागदांपासून फुलं, पंखे किंवा झालर बनवून डेकोरेशन करू शकता. रंगीबेरंगी कागदी छत्र्या, फुलपाखरे आणि हँगिंग वॉल डिझाइन करून तुम्ही बाप्पासाठी मंदिर सजवू शकता.
> लाईट आणि दिव्यांची सजावट
हिंदू सणाच्या निमित्ताने आपण नेहमीच दिवे आणि लाईटचा वापर करतो. लाईट्स आणि दिव्यांची रोषणाई नेहमीच उत्तम दिसते. तुम्ही यंदा बाप्पासाठी विद्युत रोषणाई करून त्यांचं मंदिर छान उजळू शकता.
> इको-फ्रेंडली डेकोरेशन
घरच्या बाप्पासाठी तुम्ही इको-फ्रेंडली आयडियाही वापरू शकता. तुम्ही फुलांनी डेकोरेशन करू शकता. याशिवाय तुम्ही बाप्पाच्या आजूबाजूला फुलांच्या कुंड्या लावून छान सजवू शकता.
> सध्या आणि ओढणीचा वापर करा
जर तुमच्याकडे रंगीबेरंगी साड्या आणि ओढणी असतील तर त्यांच्या मदतीने तुम्ही डेकोरेशन करू शकता. या सजावटीमुळे घर खूप रंगीबेरंगी आणि आकर्षक दिसेल. या साड्या आणि ओढणी तुम्ही पडदे म्हणून वापरू शकता.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)