सोन्याचे दागिने सगळ्यांचं आवडतात. पण हे सोन्याचे दागिने काही काळानंतर काळे पडू लागतात. अशावेळी बहुतेक लोक दागिन्यांचा काळेपणा घालवण्यासाठी सोनाराकडे जातात. पण अशावेळी सोनार सोन्याच्या दागिन्यांमधून सोने काढून टाकेल अशी भीती मनात असते. मग अशावेळी काय करावं हा प्रश्न पडतो. आता यापुढे तुम्हाला सोन्याचे दागिने साफ करण्यासाठी सोनाराकडे जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही काही हॅकच्या मदतीने तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने सहज साफ करू शकता. तुमचे दागिने नव्यासारखे बनवण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.
वापरा बेकिंग सोडा
२ चमचे बेकिंग सोडा काढा कोमट पाण्यात मिसळा आणि पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये साधारणपणे ३० मिनिटे दागिने बुडवून ठेवा. नंतर स्पंजच्या मदतीने तुमचे दागिने हळूवारपणे स्वच्छ करू शकता.
हळदीमुळे होईल दागिन्यांचा काळेपणा दूर
एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात चिमूटभर हळद आणि थोडी वॉशिंग पावडर मिसळा. आता या पाण्यात तुमचे दागिने ठेवा. आता तुमचे दागिने हलक्या हाताने स्वच्छ करा आणि पाण्याने धुवा.
लिंबू ठरेल प्रभावी
एका भांड्यात गरम पाण्यात साधारण अर्धा लिंबू पिळून घ्या. तुमचे दागिने या पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा आणि नंतर ब्रशने दागिने स्वच्छ धुवा. या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमच्या दागिन्यांचा काळेपणा दूर करू शकता.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)