Rosemary Oil For Hair: प्रत्येकाच्या सौंदर्यात भर घालते ते त्यांचे केस. लांब आणि दाट केस सगळ्यांच हवेहवेसे वाटतात. चांगल्या केसांसाठी लोक अनेक उपाय करतात. केसांची वाढ तुमच्या आहारावर आणि तुम्ही त्यांची कशी काळजी घेतात त्यावर अवलंबून असते. जर तुम्हाला तुमचे केस लांब आणि दाट हवे असतील तर केसांना तेल लावा. याचा केसांच्या वाढीवर चांगला परिणाम होईल. परंतु केसांना सामान्य तेलाऐवजी रोझमेरी तेल वापरू शकता. याने तुमचे केस काही दिवसात सुंदर आणि लांब होतील. मात्र, तुम्हाला हे तेल नक्की कसे वापरायचे हे समजले पाहिजे. चला हे तेल कसे लावायचे आणि त्याचे काय काय फायदे आहेत हे जाणून घेऊयात.
कसं लावायचं रोझमेरी तेल?
केसांवर रोझमेरी तेल लावण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे तुमच्या नेहमीच्या तेलात खोबरेल तेलात काही थेंब रोझमेरी तेल घालून वापरणे. केसांना तेल लावताना हे तेल ५-६ थेंब घेऊन छान मसाज करा.
काय फायदे मिळतील?
रोझमेरी तेल टाळूवर लावल्याने रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे केस गळती थांबते.
हे तेल केस लांब करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. छान मसाज केल्याने केसांच्या लांबीमध्ये फरक दिसून येतो.
पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त असलेले लोकही रोझमेरी तेलाचा वापर करू शकतात.
तुमच्या केसात कोंडा असेल तर आवर्जून रोझमेरी तेल वापरा.
रोझमेरी तेलामध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म टाळूची जळजळ कमी करतात.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)