माठातील पाणी दिवसभर थंडगार कसं ठेवायचं? 'हे' सोपे उपाय जाणून घ्या

उन्हाळ्यात माठातील पाणी लवकर गरम होतं? काही सोप्या उपायांनी तुम्ही ते दिवसभर नैसर्गिकरीत्या थंडगार ठेवू शकता. माठ निवडण्यापासून ते ठेवण्याच्या पद्धतीपर्यंत जाणून घ्या उपयुक्त टिप्स.
माठातील पाणी दिवसभर थंडगार कसं ठेवायचं? 'हे' सोपे उपाय जाणून घ्या
माठातील पाणी दिवसभर थंडगार कसं ठेवायचं? 'हे' सोपे उपाय जाणून घ्या
Published on

उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकालाच थंड पाणी प्यायची इच्छा होते. मात्र, फ्रिजमधील अतिशय थंड पाणी नेहमीच आरोग्यासाठी योग्य ठरत नाही. अशावेळी माठातील नैसर्गिकरीत्या थंड झालेलं पाणी शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतं. हे पाणी तहान भागवण्यासोबतच शरीरातील उष्णता कमी करतं आणि पचनक्रियेलाही मदत करतं. पण अनेकदा माठातील पाणी अपेक्षेइतकं थंड राहत नाही. काही सोप्या उपायांनी हा प्रश्न सहज सोडवता येतो.

योग्य माठाची निवड करा

माठ निवडताना तो ‘सच्छिद्र’ असणं महत्त्वाचं आहे. माठातील सूक्ष्म छिद्रांमधून बाष्पीभवन होतं आणि त्यामुळे पाणी थंड राहतं. नवीन माठ घेतल्यावर तो किमान २४ तास पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याची कार्यक्षमता वाढते.

माठ ठेवण्याची योग्य जागा निवडा

माठ नेहमी हवेशीर आणि सावलीच्या ठिकाणी ठेवावा. खिडकीजवळ किंवा जिथे हवा खेळती असते, अशा ठिकाणी ठेवला तर पाणी अधिक लवकर थंड होतं.

माठातील पाणी दिवसभर थंडगार कसं ठेवायचं? 'हे' सोपे उपाय जाणून घ्या
घरात पंखा सुरू असूनही उकाडा जाणवतोय? उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी 'हे' ५ सोपे उपाय करून पाहा

ओलं कापड गुंडाळा

माठाभोवती ओलं सुती कापड गुंडाळणं हा प्रभावी उपाय आहे. हे कापड सतत ओलं ठेवल्यास त्यातील पाणी वाफ होतानाच माठातील उष्णता कमी होतं आणि पाणी अधिक गार राहतं.

ओल्या वाळूचा वापर करा

माठाखाली ओल्या वाळूचा थर ठेवल्यास तळ थंड राहतो. त्यामुळे संपूर्ण माठातील पाणी दीर्घकाळ थंड राहतं.

स्वच्छता राखणं आवश्यक

माठ आठवड्यातून एकदा स्वच्छ धुवून घासून काढावा. बाहेर धूळ साचल्यास बाष्पीभवनाची प्रक्रिया कमी होते. मात्र, माठ धुताना साबण किंवा डिटर्जंटचा वापर टाळावा.

माठातील पाणी दिवसभर थंडगार कसं ठेवायचं? 'हे' सोपे उपाय जाणून घ्या
समर ड्रिंकसाठी काय बेस्ट? ताक की लस्सी- जाणून घ्या कोणते पेय अधिक फायदेशीर

माठ नेहमी झाकून ठेवा

माठावर मातीचं झाकण ठेवल्यास पाणी अधिक काळ थंड राहतं. तसेच पाणी काढताना हात न घालता तांब्याचा वापर केल्यास पाणी स्वच्छ राहते.

या छोट्या-छोट्या सवयी अंगीकारल्यास फ्रिजशिवायही माठातील पाणी दिवसभर नैसर्गिकरीत्या थंडगार ठेवता येतं.

logo
marathi.freepressjournal.in