Cheese Bread Pakora: थंडगार वातावरण नाश्त्यासाठी बनवा चीज ब्रेड पकोडा, जाणून घ्या रेसिपी

Breakfast Recipe: मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. अशा वेळी झालेल्या थंडगार पावसात तुम्ही नाश्त्यासाठी चीज ब्रेड पकोडा बनवून खाऊ शकता.
How to make Cheese Bread Pakoda
How to make Cheese Bread Pakoda Freepik
Published on

Cheese Bread Pakora Recipe: राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. पावसामुळे (Monsoon Recipe) सगळीकडेच थंडगार वातारण झालं आहे. अशावेळी गरमागरम आणि टेस्टी काहीतरी नाश्त्याला खावेसे वाटते. ही रेसिपी झटपट तयार होणारी असावी असेही वाटते. मग अशा रेसिपीचा शोध घेतला जातो. जर तुम्हीही हाच शोध घेत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहे. तुम्ही नाश्त्यासाठी चीज ब्रेड पकोडा बनवून खाऊ शकता. याची रेसिपी सोपी आणि झटपट होणारी आहे. चला रेसिपी जाणून घेऊयात.

लागणारे साहित्य

  • बेसन - १ कप

  • लाल मिरची पावडर - १ टीस्पून

  • हल्दी पावडर - १ टीस्पून

  • कसुरी मेथी - १ मोठी चिमूटभर

  • जिरे पावडर - १ टीस्पून

  • पाणी - २ कप

  • मीठ - चवीनुसार

  • तेल- २ चमचे

  • मोहरी - १ टीस्पून

  • हिरवी मिरची - १ (बारीक चिरलेली)

  • आले - १ टीस्पून (बारीक चिरून)

  • लसूण- १/२ टीस्पून (बारीक चिरून)

How to make Cheese Bread Pakoda
Ginger Chicken Masala Recipe: पावसाळ्यात जेवणासाठी बनवा टेस्टी 'जिंजर चिकन मसाला',नोट करा रेसिपी
  • कढीपत्ता - आवश्यकतेनुसार (बारीक चिरून)

  • कांदा - १/२ कप (बारीक चिरलेला)

  • गाजर - १/२ कप (बारीक चिरून)

  • सिमला मिरची - १/२ कप (बारीक चिरून)

  • धणे - आवश्यकतेनुसार (बारीक चिरून)

  • उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे - २ कप

  • चीज - १०० ग्रॅम

  • ब्रेड स्लाइस - ८

  • पाणी - १/२ कप

  • तेल - तळण्यासाठी

  • चाट मसाला - गार्निशसाठी

How to make Cheese Bread Pakoda
Besan Sooji Toast: वीकेंडला जेवणासाठी बनवा बेसन रवा टोस्ट, झटपट तयार होणारी रेसिपी नोट करा!

जाणून घ्या कृती

  • एका भांड्यात बेसन, हळद, मिरची पावडर, मीठ आणि कसुरी मेथी घाला. यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करून पेस्ट बनवा.

  • यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची, आले आणि लसूण घालून चांगले परतून घ्या.

  • यानंतर, त्यात सर्व भाज्या घाला आणि काही वेळ सर्वकाही शिजवा. त्यावर कोथिंबीर घालून मिक्स करा.

  • यानंतर एका भांड्यात उकडलेले बटाटे चांगले मॅश करा. त्यात तयार मसाला घालून मिक्स करा.

  • यानंतर हे मिश्रण ब्रेड स्लाइसवर पसरवा आणि त्यावर चीज स्लाइस ठेवा आणि दंडगोलाकार आकारात रोल करा.

How to make Cheese Bread Pakoda
Moong Dal Nuggets: पावसात घ्या मूग डाळ नगेट्सचा आस्वाद, जाणून घ्या रेसिपी
  • यानंतर ब्रेड स्लाइसच्या कडा कापून त्यात स्टफिंग भरा.

  • नंतर ब्रेडच्या काठावर पाणी लावून बंद करा.

  • यानंतर ते बेसन तयार केलेल्या द्रावणात बुडवा.

  • नंतर कढईत तळण्यासाठी तेल घालून गरम करा. त्यात तयार ब्रेड टाका आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

  • नंतर ते टिश्यू पेपरवर काढा, जेणेकरून अतिरिक्त तेल वेगळे होईल.

  • तुमचे मसालेदार चीज ब्रेड पकोडे तयार आहेत. चाट मसाला घालून गरमागरम सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in