Tea Time Snacks Recipe: आजकाल डायटची क्रेझ आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धतीचे डायट केले जाते. पण अशा डाएटमध्ये अनेकदा तोच तोच पणा येतो. अशावेळी काही तरी वेगळं खावेसे वाटते. यासाठी तुम्हाला डाएटिंगची चिंता करावी लागणार नाही आणि तुमचे वजनही सहज कमी होईल. आज आम्ही तुम्हाला हेल्दी, चविष्ट आणि वजन कमी करण्याची रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी पावसाळ्यात (Monsoon Recipe) फार आनंदही देईल. यामुळे तुमचे वजनही वाढणार नाही. तुम्ही ओट्स आणि पनीरची टिक्की बनवू शकता. यामध्ये फायबर, लोह, प्रथिने आणि व्हिटॅमिन बी १ ने समृद्ध असलेली ही टिक्की आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ओट्स आणि पनीर टिक्की कशी बनवायची हे जाणून घ्या.
लागणारे साहित्य
३ कप ओट्स
१ कप- पनीर
१०० ग्रॅम - बीन्स
२ कप- गाजर
२-३ हिरव्या मिरच्या
१/ १/२ टीस्पून लाल मिरची पावडर
१/ १/२ टीस्पून धने पावडर
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
जाणून घ्या कृती
> सर्वप्रथम सर्व भाज्या नीट धुवून बारीक चिरून घ्या. ओट्स ब्लेंडरमध्ये बारीक करून पावडर बनवा आणि पनीर किसून घ्या.
> आता एका भांड्यात सर्व भाज्या, चीज आणि ओट्स पावडर मिक्स करा आणि मसाले घाला. हॅ मिश्रण छान मिक्स करून घ्या.
> छान तयार झालेले पीठ १० मिनिटे सेट करण्यासाठी ठेवा. पीठ सेट झाल्यावर त्याला तुम्हाला हवा त्या आकारात टिक्की तयार करा.
> आता तव्यावर किंवा पॅनवर तेल लावा. गॅसची आच मध्यम ठेवा आणि तेल गरम करून घ्या. त्यावर टिक्की ठरवून छान शिजवा. टिक्की हलक्या तपकिरी होईपर्यंत शिजवून घ्या.
> सर्व टिक्की त्याच प्रकारे तयार करा आणि टिक्की कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या.
> सगळ्या टिक्की छान शॅलो फ्राय करून झाल्यावर तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा.
ओट्स पनीर टिक्की खूप चविष्ट लागते तसेच ती हेल्दीसुद्धा आहे. विशेष म्हणजे ही टिक्की खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही. तुम्ही ओट्स टिक्की सहजपणे बनवू शकता आणि ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्स म्हणून कधीही खाऊ शकता.