Potato Rings Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा बटाट्याच्या रिंग्ज, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या

Monsoon Recipe: पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खाण्यासाठी बटाट्याच्या रिंग्ज हा बेस्ट ऑप्शन आहे.
Potato Rings Recipe
freepik
Published on

Evening Snacks Recipe: पावसामुळे सगळीकडेच थंड वातावरण झाला आहे. अशा थंड वातावरणात काही तरी गरम खावेसे वाटते. अशावेळी काय बनावं असा प्रश्न पडतो. जर तुम्हीही स्नॅक्समध्ये काहीतरी चवदार आणि वेगळं बनवण्याचा विचार करत असाल तर आम्ही ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्ही बटाट्याच्या रिंग्ज बनवू शकता. या कुरकुरीत बटाट्याच्या रिंग्ज फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही खायला आवडतील. विशेष म्हणजे याला बनवायला जास्त सामान आणि वेळ लागत नाही. चला याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

लागणारे साहित्य

  • रवा - १ कप (भाजलेला)

  • दही - १ कप

  • बटाटा - २ (उकडलेले आणि मॅश केलेले)

  • आले पेस्ट - १ टीस्पून

  • लसूण पेस्ट - १ टीस्पून

Potato Rings Recipe
Cheese Bread Pakora: थंडगार वातावरण नाश्त्यासाठी बनवा चीज ब्रेड पकोडा, जाणून घ्या रेसिपी
  • कॉर्न फ्लोअर - २ चमचे

  • चिली फ्लेक्स - १ टीस्पून

  • चाट मसाला- १ टीस्पून

  • क्पथिंबीर - २ चमचे

  • तेल- तळण्यासाठी

  • मीठ - चवीनुसार

Potato Rings Recipe
Ginger Chicken Masala Recipe: पावसाळ्यात जेवणासाठी बनवा टेस्टी 'जिंजर चिकन मसाला',नोट करा रेसिपी

जाणून घ्या

  • कुरकुरीत बटाटा रिंग्ज बनवण्यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात दही आणि रवा घाला.

  • यानंतर या दोन गोष्टी नीट मिक्स करून फेटा.

  • आता आलं आणि लसूण पेस्ट, चिली फ्लेक्स, चाट मसाला आणि मीठ घाला.

  • नंतर सर्वकाही चांगले मिसळा आणि त्यात कॉर्न फ्लोअर आणि मॅश केलेले बटाटे घाला.

  • या पिठाचा एक गोळा घ्या आणि रोलिंग पिनच्या मदतीने चपटा करा.

  • यानंतर, त्यास रिंग्जमध्ये कापून बाजूला ठेवा.

  • नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात बटाट्याच्या रिंग्ज घालाव्यात.

  • ते सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. मग तुमच्या चवदार बटाट्याच्या रिंग्ज तयार आहेत.

  • तुमच्या आवडत्या चटणी किंवा चहासोबत त्यांचा आनंद घ्या.

logo
marathi.freepressjournal.in