How to Make Poha Dhokla: सकाळचा नाश्ता महत्त्वाचा असतो. सकाळी निरोगी आणि टेस्टी पदार्थ खावंसं वाटते. भारतीय घरात पोहे नाश्त्यासाठी बनवले जातात. पण तुम्हाला रेगुलर पोहे खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल यापासून काही तरी हटके पदार्थ तुम्ही बनवू शकता. तुम्ही पोह्यांपासून ढोकळा बनवू शकता. होय तुम्ही पोह्यांपासून टेस्टी आणि स्पॉन्जी ढोकळा बनवू शकता. हे खाण्यास अतिशय मऊ आणि हलके आहे. पोह्यांपासून बनवलेला ढोकळा एकदा खाल्ला तर बेसनापासून बनवलेला ढोकळा खाणे विसराल. पोह्यांपासून बनवलेला ढोकळा तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी नाश्त्यात खाऊ शकता. चला पोहे ढोकळ्यांची सोपी रेसिपी जाणून घ्या.
लागणारे साहित्य
१ कप पोहे, १ कप रवा, १ कप दही, १/२ चमचा बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, १ चमचा तेल, ८-१० कढीपत्ता, ३-४ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चिमूटभर हिंग, २ चिमूट मोहरी, १/२ टीस्पून हळद
जाणून घ्या रेसिपी
पोहे स्वच्छ करून २-३ वेळा पाण्याने धुवा आणि अंदाजे २ तास भिजत ठेवा.
२ तासानंतर पोह्यातील जास्तीचे पाणी काढून मिक्सरमध्ये फिरवून त्याची स्मूद पेस्ट बनवा.
पोह्यांपासून तयार केलेली पेस्ट एका भांड्यात काढून त्यात नीट रवा मिसळून घ्या.
आता दही फेटून पोहे-रव्याच्या मिश्रणात घाला. त्यात मीठ मिसळा आणि १५ मिनिटे झाकून ठेवा.
आता मिश्रण फेटून त्यात बेकिंग सोडा मिक्स करा. सोडा मिक्स करताना एकाच दिशेने मिक्स करा.
प्लेटला तेल लावून मिश्रण पसरवा. आता त्यात मिश्रण व्यवस्थित पसरून घ्या.
आता उकळलेल्या पाणीमध्ये वरती प्लेट ठेवून हे मिश्रण शिजवण्यासाठी करायला ठेवा. अंदाजे ढोकळा शिजवण्यासाठी २०-२५ मिनिटे झाकून ठेवा.
बाहेर काढून नंतर थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर त्यावर फोडणी घाला.
फोडणी तयार करण्यासाठी कढईत तेल टाका आणि गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग, हिरवी मिरची, हळद आणि कढीपत्ता घाला.
त्यात थोडे पाणी घाला आणि गोडपणासाठी १ चमचे साखर देखील घालू शकता.
ढोकळ्याच्या ताटात फोडणी चांगली पसरवा आणि नंतर सुरीने कापून सर्व्ह करा.
पोह्यांपासून बनवलेला हा ढोकळा खूप हलका असतो.