International Sushi Day: तुम्ही कधी व्हेज सुशी खाल्ली आहे? 'ही' रेसिपी जाणून घ्या

Vegetable Sushi Recipe: मूळचा जपानचा असणारा सुशी हा पदार्थ जगभरात खाल्ला जातो. चला आज आंतरराष्ट्रीय सुशी दिनानिमित्त आपण व्हेजिटेबल सुशीची रेसिपी जाणून घेऊयात.
International Sushi Day 2024
Freepik
Published on

International Sushi Day 2024, 18 June: दरवर्षी, १८ जून रोजी आंतरराष्ट्रीय सुशी दिवस साजरा केला जातो. हा एक सर्वात लोकप्रिय जपानी पदार्थांपैकी एक पदार्थ आहे. इतर कोणत्याही डिशप्रमाणेच, सुशीचा जपानमधील प्राचीन काळापासूनचा समृद्ध इतिहास आहे. ही डिश तुम्हाला कोणत्याही मोठ्या रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये मिळेल. सुशीचे अनेक प्रकार असतात. याचे बेसिक साहित्य म्हणजे चिकट भात, व्हिनेगर आणि सीफूड. पण आज आपण आंतरराष्ट्रीय सुशी दिनानिमित्त आपण व्हेजिटेबल सुशीची रेसिपी जाणून घेऊयात.

  • सुशी तांदूळ - ४ कप

  • साखर - १/२ कप

  • व्हिनेगर - १ कप

  • एवोकॅडो- १

  • गाजर - १

  • शिमला मिरची- १

  • नोरी शीट्स- आवश्यकतेनुसार

International Sushi Day 2024
Sprouts Paratha: नाश्त्यात बनवा स्प्राउट्स पराठा, चवीसोबत मिळेल आरोग्य; नोट करा रेसिपी

नोरी शीट्स काय असते?

हा जपानमध्ये पिकवल्या जाणाऱ्या सीव्हीडचा एक प्रकार आहे. हे वाळवले जाते आणि शीटमध्ये बदलले जाते. या शीट्स सुशी रोलसाठी आधार म्हणून वापरले जाते. हे तुम्हाला कोणत्याही सुपरमार्केटमध्ये मिळेल.

International Sushi Day 2024
Paneer Paratha Recipe: नाश्त्यात बनवा झटपट तयार होणारे पनीर पराठे, नोट करा रेसिपी

जाणून घ्या कृती

  • सर्व प्रथम सुशी तांदूळ उकडून घ्या आणि नंतर या उकडलेल्या भातामध्ये व्हिनेगर घाला. तेव्हा भात गरम असेल याची काळजी घ्या. हे छान एकत्र मिक्स करून बाजूला ठेवा.

  • आता एक नोरी शीट घ्या त्यावर मगाशी बनवून ठेवलेल्या भाताचे मिश्रण पसरवा. हा भात पसरवताना शीटच्या काठाच्या इथे जागा ठेवा.

  • आता त्यावर चिरलेल्या भाज्या घाला आणि सुशीला एका बाजूने गुंडाळा आणि पूर्ण रोल करा. हे रोल करताना छान दाबत रोल करा आणि शेवटी त्यात थोडे पाणी लावून चिकटवा, यामुळे रोल उघडू नये.

  • आता या रोलचे १.५ इंच तुकडे करा. रोल कापताना लक्षात ठेवा की चाकू ओला असावा, तरच भात त्यावर चिकटणार नाही. तुमची चविष्ट भाजी सुशी तयार आहे.

logo
marathi.freepressjournal.in