विकेंडला घरच्यांना द्या खास ट्रीट! अशी बनवा खमंग हैदराबादी चिकन बिर्याणी

विकेंडला घरच्या घरी खमंग हैदराबादी चिकन बिर्याणी बनवा. चिकन, बासमती तांदूळ आणि मसाल्यांसह सोपी बिर्याणी रेसिपी जाणून घ्या.
विकेंडला घरच्यांना द्या खास ट्रीट! अशी बनवा खमंग हैदराबादी चिकन बिर्याणी
विकेंडला घरच्यांना द्या खास ट्रीट! अशी बनवा खमंग हैदराबादी चिकन बिर्याणी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

विकेंड म्हटलं की काहीतरी खास आणि चमचमीत खाण्याचा बेत हमखास ठरतो. रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळं बनवायचं असेल, तर चिकन बिर्याणी हा घरच्यांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेषतः मसालेदार चिकन, सुगंधी बासमती तांदूळ आणि वरून तळलेला कांदा यांचा मेळ बिर्याणीची चव आणखी खुलवतो.

हैदराबादी बिर्याणीची खासियत म्हणजे मसाल्यांचा सुगंध आणि दमवर शिजवण्याची पद्धत. त्यामुळे चिकन आणि तांदळामध्ये मसाल्यांचा स्वाद छान मुरतो. हॉटेलमध्ये जाऊन बिर्याणी खाण्याऐवजी यावेळी घरच्या घरीच खमंग हैदराबादी चिकन बिर्याणी बनवून पाहा.

हैदराबादी चिकन बिर्याणीसाठी साहित्य

  • बासमती तांदूळ - २ कप

  • चिकन - ५०० ग्रॅम

  • कांदे - २ मोठे

  • दही - १ कप

  • आले-लसूण पेस्ट - २ टेबलस्पून

  • हिरव्या मिरच्या - २ ते ३

  • लाल तिखट - १ टीस्पून

  • हळद - अर्धा टीस्पून

  • धणेपूड - १ टीस्पून

  • जिरेपूड - १ टीस्पून

  • गरम मसाला - १ टीस्पून

  • बिर्याणी मसाला - १ टेबलस्पून

  • कोथिंबीर - मूठभर

  • पुदिना - मूठभर

  • दूध - पाव कप

  • केशर - काही कण

  • तूप किंवा तेल - ४ टेबलस्पून

  • मीठ - चवीनुसार

तांदूळ शिजवण्यासाठी :
पाणी, मीठ, तमालपत्र, लवंग, वेलची आणि दालचिनी.

(वरील साहित्याचे प्रमाण साधारण ४ जणांसाठी आहे. तुम्ही किती जणांसाठी बिर्याणी बनवणार आहात, त्यानुसार साहित्याचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.)

विकेंडला घरच्यांना द्या खास ट्रीट! अशी बनवा खमंग हैदराबादी चिकन बिर्याणी
चायनीज-फास्टफूड विसराल! पावसाळ्यात एकदा ट्राय करा हॉटेल स्टाइल व्हेज पुलाव

आधी चिकनला मसाला लावून ठेवा

एका भांड्यात चिकन घेऊन त्यात दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, बिर्याणी मसाला, हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर आणि पुदिना घाला. सर्व साहित्य चिकनला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मिसळून घ्या.

हे चिकन किमान एक तास झाकून ठेवून मुरू द्या. वेळ असेल तर थोडा जास्त वेळ मुरवल्यास मसाल्याची चव चिकनमध्ये चांगली मुरते.

तांदूळ किती शिजवायचा?

एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात मीठ, तमालपत्र, लवंग, वेलची आणि दालचिनी घाला. आता त्यात धुतलेला बासमती तांदूळ घाला.

तांदूळ पूर्ण शिजवायचा नाही. तो साधारण ७० ते ८० टक्के शिजल्यानंतर लगेच गाळून घ्या. बिर्याणीला दम देताना तांदूळ पुढे शिजणार असल्याने तो सुरुवातीलाच पूर्ण मऊ करू नका.

तळलेला कांदा देईल बिर्याणीला खास चव

कांदे पातळ कापून घ्या. पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करून त्यात कांदा सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. हा तळलेला कांदा बाजूला काढून ठेवा. बिर्याणीच्या थरांमध्ये आणि वरून घातल्यास त्याचा स्वाद आणि सुगंध छान येतो.

आता बिर्याणीला द्या दम

जाड लेअरच्या भांड्यात थोडं तूप किंवा तेल लावून घ्या. त्यावर मुरवलेलं चिकन पसरवा. त्यावर अर्धवट शिजवलेला तांदूळ घाला.

यानंतर वरून तळलेला कांदा, पुदिना आणि कोथिंबीर पसरवा. दुधात भिजवलेले केशर घाला. आवडीनुसार थोडं तूपही वरून सोडू शकता.

भांड्यावर झाकण घट्ट लावा. सुरुवातीला साधारण ५ मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. त्यानंतर गॅस मंद करून आणखी २५ ते ३० मिनिटे दमावर बिर्याणी शिजू द्या.

विकेंडला घरच्यांना द्या खास ट्रीट! अशी बनवा खमंग हैदराबादी चिकन बिर्याणी
फक्त कांदा, ब्रेड आणि चीज... ५ मिनिटांत तयार होईल खमंग तवा सॅण्डविच; पावसाळ्यात नक्की ट्राय करा
विकेंडला घरच्यांना द्या खास ट्रीट! अशी बनवा खमंग हैदराबादी चिकन बिर्याणी
रात्रीच्या जेवणाची वाढवा रंगत! घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोफ्ता करी; पाहा सोपी रेसिपी

गॅस बंद केल्यानंतर काही मिनिटे झाकण न उघडता तसेच राहू द्या. त्यानंतर हलक्या हाताने बिर्याणी सर्व्ह करा.

रायता, सालनसोबत करा सर्व्ह

खमंग हैदराबादी चिकन बिर्याणी गरमागरम सर्व्ह करा. सोबत कांदा-टोमॅटोचा रायता, साधं दही किंवा सालन दिल्यास जेवणाची रंगत आणखी वाढेल.

बिर्याणी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा

तांदूळ जास्त शिजवू नका. तांदूळ आधीच पूर्ण मऊ झाला तर दम देताना तो चिकट होण्याची शक्यता असते. बिर्याणीचा प्रत्येक तांदूळ वेगळा आणि छान फुललेला हवा असेल, तर तांदूळ सुरुवातीला फक्त ७० ते ८० टक्केच शिजवा.

logo
marathi.freepressjournal.in