उन्हाळ्यातील खास डिश! आंबट-तिखट कैरी राईस; एकदा खाऊन बघाच

उन्हाळ्यातील खास कैरी राईस रेसिपी जाणून घ्या. आंबट-तिखट चवीचा हा झटपट पदार्थ घरीच सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते वाचा.
उन्हाळ्यातील खास डिश! आंबट-तिखट कैरी राईस; एकदा खाऊन बघाच
उन्हाळ्यातील खास डिश! आंबट-तिखट कैरी राईस; एकदा खाऊन बघाच'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

उन्हाळ्यात कैरीपासून बनणारे पदार्थ खाण्याची मजाच काही वेगळी असते. आंबट, तिखट आणि हलकी चव असलेला 'कैरी राईस' (Mango Rice) हा असाच एक झटपट आणि चविष्ट पदार्थ आहे. कमी वेळात तयार होणारा हा राईस लंचबॉक्स किंवा दुपारच्या जेवणासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

साहित्य :

  • बासमती तांदूळ (शिजवलेला) - १ कप

  • मध्यम आकाराची कैरी (किसलेली) - १

  • हिरवे मटार - अर्धा कप

  • जिरे - १ टीस्पून

  • लसूण पाकळ्या - ४ ते ५

  • लाल तिखट - १ टीस्पून

  • हळद - अर्धा टीस्पून

  • आचार मसाला - १ टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - २ टेबलस्पून

उन्हाळ्यातील खास डिश! आंबट-तिखट कैरी राईस; एकदा खाऊन बघाच
उन्हाळ्यातील चटपटीत रेसिपी; जेवणाची चव वाढवणारं कैरीचं लोणचं, एकदा खाल तर फॅन व्हाल

कृती :

सर्वप्रथम कैरी किसून घ्या. जिरे भाजून त्यात लसूण आणि लाल तिखट घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करा. बासमती तांदूळ शिजवून फुलवून घ्या. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात तयार केलेली जिरं-लसूण पेस्ट टाका आणि छान परतून घ्या. आता त्यात हिरवे मटार आणि किसलेली कैरी घालून नीट मिसळा. त्यानंतर शिजवलेला भात, आचार मसाला, हळद आणि मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करा. सर्व मिश्रण छान एकत्र झाल्यावर गरमागरम कैरी राईस सर्व्ह करा.

उन्हाळ्यातील खास डिश! आंबट-तिखट कैरी राईस; एकदा खाऊन बघाच
Summer Special : कच्च्या कैरीची चटणी; १० मिनिटांत तयार होणारी झणझणीत रेसिपी, भाकरीसोबत लागते जबरदस्त

टिप्स :

  • गरमागरम कैरी राईस आंबा किंवा कैरीच्या चटणीसोबत सर्व्ह केल्यास चव छान लागते.

  • कैरी जास्त आंबट असल्यास तिखट आणि मीठ यांच्या प्रमाणात समतोल ठेवा.

  • आचार मसाला घातल्याने राईसला वेगळी चव येते.

  • शिजवलेला भात पूर्ण थंड झाल्यावर वापरल्यास दाणे मोकळे राहतात.

  • थोडे काजू किंवा शेंगदाणे घातल्यास चव आणि टेक्स्चर वाढते.

logo
marathi.freepressjournal.in