कडू कारल्याची अशी करा चविष्ट भूर्जी; पोळी-भाकरीसोबत लागेल मस्त, मुलंही आवडीने खातील

कारल्याची भाजी मुलं खात नाहीत? बेसन, बडीशेप आणि मसाल्यांचा वापर करून बनवा चविष्ट कारल्याची भूर्जी. जाणून घ्या सोपी रेसिपी आणि खास टिप्स.
कडू कारल्याची अशी करा चविष्ट भूर्जी; पोळी-भाकरीसोबत लागेल मस्त, मुलंही आवडीने खातील
कडू कारल्याची अशी करा चविष्ट भूर्जी; पोळी-भाकरीसोबत लागेल मस्त, मुलंही आवडीने खातील'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

कारलं आरोग्यदायी असलं तरी त्याची कडू चव अनेकांना अजिबात आवडत नाही. विशेषतः मुलांच्या ताटात कारल्याची भाजी आली की ती बाजूला सारली जाते. काही मोठ्यांनाही कारलं खाणं कंटाळवाणं वाटतं. अशावेळी नेहमीची भाजी करण्याऐवजी थोड्या वेगळ्या पद्धतीने कारल्याची चमचमीत भूर्जी तयार करता येते. कारल्यातील कडूपणा कमी करून त्यात बेसन, बडीशेप आणि मसाल्यांची चव दिल्यास हा पदार्थ अधिक रुचकर लागतो. रोजच्या आहारात कारल्याचा समावेश करण्यासाठी ही सोपी रेसिपी ट्राय करू शकता.

साहित्य

  • बारीक चिरलेले किंवा किसलेले कारले - २५० ग्रॅम

  • बेसन - ३ मोठे चमचे

  • बडीशेप - २ चमचे

  • मोहरीचे तेल - ३ चमचे

  • बारीक चिरलेला कांदा - १

  • हिरव्या मिरच्या - २

कडू कारल्याची अशी करा चविष्ट भूर्जी; पोळी-भाकरीसोबत लागेल मस्त, मुलंही आवडीने खातील
कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवायची आहे? ट्राय करा या २ सोप्या पद्धती
  • जिरे - अर्धा चमचा

  • मोहरी - अर्धा चमचा

  • हिंग - चिमूटभर

  • धनेपूड - १ चमचा

  • लाल तिखट - १ चमचा

  • हळद - अर्धा चमचा

  • आमचूर पावडर - १ चमचा

  • मीठ - चवीनुसार

कृती

सर्वप्रथम चिरलेल्या कारल्यात मीठ घालून १० ते १५ मिनिटे ठेवा. नंतर हाताने दाबून त्यातील पाणी काढा आणि कारले स्वच्छ धुऊन कोरडे करा.

कढईत बेसन मंद आचेवर हलके सोनेरी होईपर्यंत भाजून बाजूला ठेवा. त्याच कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग आणि भरड केलेली बडीशेप घाला. त्यात कांदा आणि हिरवी मिरची घालून परता.

आता कारले घालून झाकण ठेवून ७ ते ८ मिनिटे शिजवा. त्यानंतर हळद, तिखट, धनेपूड आणि मीठ घालून परता. शेवटी भाजलेले बेसन आणि आमचूर घालून ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर परता. गरमागरम भूर्जी पोळी किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.

कडू कारल्याची अशी करा चविष्ट भूर्जी; पोळी-भाकरीसोबत लागेल मस्त, मुलंही आवडीने खातील
काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खावंसं वाटतंय? करून पाहा कांदा-टोमॅटो बन

खास टिप्स

कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी मीठ लावून त्यातील पाणी व्यवस्थित पिळून काढा. बेसन आधी भाजल्यास भूर्जीला खमंग चव येते, तर बडीशेप आणि आमचूरमुळे चव अधिक संतुलित होते.

logo
marathi.freepressjournal.in