Karisma Kapoor Fitness : वयाच्या ५२ व्या वर्षीही करिश्मा कपूर इतकी फिट कशी? ऋजुता दिवेकरांनी सांगितला अभिनेत्रीचा फिटनेस मंत्र

वयाच्या ५२ व्या वर्षीही करिश्मा कपूर इतकी फिट कशी राहते? आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितल्या संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैलीच्या महत्त्वाच्या टिप्स.
Karisma Kapoor Fitness : वयाच्या ५२ व्या वर्षीही करिश्मा कपूर इतकी फिट कशी? ऋजुता दिवेकरांनी सांगितला अभिनेत्रीचा फिटनेस मंत्र
Karisma Kapoor Fitness : वयाच्या ५२ व्या वर्षीही करिश्मा कपूर इतकी फिट कशी? ऋजुता दिवेकरांनी सांगितला अभिनेत्रीचा फिटनेस मंत्र
Published on: 

वाढत्या वयासोबत शरीरात अनेक बदल होतात. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात, तर पूर्वीसारखा फिटनेस टिकवणंही अनेकांना कठीण वाटतं. मात्र, बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आजही आपल्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. वयाच्या ५२ व्या वर्षीही ती स्वतःला इतकं फिट कसं ठेवते, असा प्रश्न अनेकांना पडतो. विशेष म्हणजे, यामागे कोणतंही कठीण डाएट किंवा वजन कमी करण्याचा शॉर्टकट नाही. नियमित व्यायाम, घरचं संतुलित जेवण आणि रोजच्या चांगल्या सवयी महत्त्वाच्या असल्याचं सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आहे. त्यांच्या मते, वाढत्या वयातही निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काही सोप्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

फिट राहण्यासाठी शॉर्टकट नाही, सातत्य महत्त्वाचं

ऋजुता दिवेकर यांच्या मते, फिटनेस मिळवण्यासाठी उपाशी राहण्याची किंवा कठीण डाएट करण्याची गरज नाही. त्याऐवजी रोजच्या जीवनात चांगल्या सवयी लावणं अधिक महत्त्वाचं आहे. वेळेवर जेवण, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती यामुळे शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. काही दिवस व्यायाम करून किंवा एखादं डाएट पाळून अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्यासाठी सातत्य राखणं गरजेचं असतं.

Karisma Kapoor Fitness : वयाच्या ५२ व्या वर्षीही करिश्मा कपूर इतकी फिट कशी? ऋजुता दिवेकरांनी सांगितला अभिनेत्रीचा फिटनेस मंत्र
Health Tips : जेवल्यानंतर लगेच झोपता? फक्त २ मिनिटं चालल्याने शरीरात काय बदल होतात? डॉ. नेनेंनी सांगितले शतपावलीचे फायदे

३० वर्षांनंतर वजनापेक्षा शरीराच्या ताकदीकडे लक्ष द्या

अनेक महिला वयाच्या ३० वर्षांनंतर वाढत्या वजनामुळे चिंतेत असतात. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन आणि व्यायामाचे प्रकारही करून पाहतात. मात्र, ऋजुता दिवेकर यांच्या मते, केवळ वजन कमी करण्यापेक्षा शरीराचे स्नायू मजबूत करणं आणि ताकद वाढवणं महत्त्वाचं आहे. वाढत्या वयात शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होत असल्याने योग्य पोषण आणि नियमित शारीरिक हालचालींकडे लक्ष द्यायला हवं.

आठवड्यातून किमान ३ तास व्यायाम करा

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज तासन्‌तास जिममध्ये घाम गाळण्याची गरज नाही. आठवड्यातून किमान ३ तास शारीरिक हालचालींसाठी वेळ काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये ३० ते ४० मिनिटं चालणं, हलक्या वजनांचा व्यायाम किंवा योगासनांचा समावेश करता येतो. नियमित व्यायामामुळे स्नायू मजबूत होण्यास, शरीराची ताकद वाढण्यास आणि हाडांचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.

फिटनेससाठी भात-पोळी खाणं बंद करू नका

वजन कमी करण्याच्या नादात अनेक जण सर्वप्रथम भात आणि पोळी खाणं बंद करतात. मात्र, ऋजुता दिवेकर यांच्या मते, फिट राहण्यासाठी आहारातील कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि ती मिळवण्यासाठी कार्बोहायड्रेट्सही महत्त्वाचे असतात. त्यामुळे भात, पोळी, डाळी, भाज्या आणि स्थानिक पदार्थांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा. शरीराला पुरेशी जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळतील, याचीही काळजी घ्यावी.

Karisma Kapoor Fitness : वयाच्या ५२ व्या वर्षीही करिश्मा कपूर इतकी फिट कशी? ऋजुता दिवेकरांनी सांगितला अभिनेत्रीचा फिटनेस मंत्र
वजन कमी म्हणजे मधुमेहाचा धोका नाही असं समजू नका; सडपातळ व्यक्तींनाही होऊ शकतो डायबिटीज, तज्ज्ञांचा इशारा

पुरेशी झोप आणि आनंदी राहणंही गरजेचं

फिटनेस म्हणजे केवळ व्यायाम आणि डाएट नाही. शरीरासोबत मनाचं आरोग्य जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. दररोज ७ ते ९ तासांची पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करावा. यामुळे शरीराला विश्रांती मिळते. त्याचबरोबर सतत डाएटचाच विचार न करता आवडीच्या पदार्थांचा योग्य प्रमाणात आनंद घ्यावा. स्वतःसाठी वेळ काढणं, ताण कमी ठेवणं आणि आनंदी राहणं यामुळेही जीवनशैली संतुलित ठेवण्यास मदत होते.

ऋजुता दिवेकर यांच्या या टिप्समधून एक गोष्ट स्पष्ट होते. वाढत्या वयातही फिट राहण्यासाठी महागडे डाएट प्लॅन किंवा शॉर्टकटपेक्षा रोजच्या चांगल्या सवयी आणि त्यातील सातत्य अधिक महत्त्वाचं आहे.