उरलेल्या चपात्यांचं काय कराल? मुलांसाठी झटपट तयार करा चटपटीत चायनीज भेळ

जेवण बनवताना बऱ्याचदा चपात्यांचा अंदाज चुकतोच. कधी दोन चपात्या जास्त होतात, तर कधी अचानक कुणी जेवण कमी करतं आणि चपात्या शिल्लक राहतात. मग या उरलेल्या चपात्यांचं काय करायचं, हा प्रश्न हमखास पडतो. अशावेळी या उरलेल्या चपात्यांपासून तुम्ही घरीच चटपटीत, कुरकुरीत आणि मुलांना आवडेल अशी चायनीज भेळ झटपट तयार करू शकता. कमी साहित्य, कमी वेळ आणि चव मात्र जबरदस्त!!!
उरलेल्या चपात्यांचं काय कराल? मुलांसाठी झटपट तयार करा चटपटीत चायनीज भेळ
उरलेल्या चपात्यांचं काय कराल? मुलांसाठी झटपट तयार करा चटपटीत चायनीज भेळ
Published on

जेवण बनवताना बऱ्याचदा चपात्यांचा अंदाज चुकतोच. कधी दोन चपात्या जास्त होतात, तर कधी अचानक कुणी जेवण कमी करतं आणि चपात्या शिल्लक राहतात. मग या उरलेल्या चपात्यांचं काय करायचं, हा प्रश्न हमखास पडतो. त्यातच मुलांनी चायनीज भेळचा हट्ट धरला, तर बाहेरचं खाणं टाळायचं असतं. अशावेळी या उरलेल्या चपात्यांपासून तुम्ही घरीच चटपटीत, कुरकुरीत आणि मुलांना आवडेल अशी चायनीज भेळ झटपट तयार करू शकता. कमी साहित्य, कमी वेळ आणि चव मात्र जबरदस्त!

साहित्य :

  • उरलेल्या चपात्या

  • आलं-लसूण (बारीक चिरलेलं)

  • कांदा

  • गाजर

  • शिमला मिरची

उरलेल्या चपात्यांचं काय कराल? मुलांसाठी झटपट तयार करा चटपटीत चायनीज भेळ
काय सांगता! पास्ता बनवणं कठीण वाटतंय? 'ही' रेसिपी ट्राय करा, १५ मिनिटांत होईल तयार
  • कोबी

  • शेजवान सॉस

  • सोया सॉस

  • काळी मिरी पावडर

  • मीठ (चवीनुसार)

  • तेल

कृती :

सर्वप्रथम उरलेल्या चपात्या घ्या आणि त्या नूडल्ससारख्या लांब पट्ट्यांमध्ये कापून ठेवा. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून या चपातीचे पट्टे मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. हवं असल्यास हे पट्टे एअर फ्रायरमध्ये किंवा तव्यावरही हलक्या तेलात भाजू शकता.

यानंतर कढई गॅसवर ठेवा आणि त्यात थोडं तेल गरम करा. तेल तापल्यानंतर त्यात बारीक चिरलेलं आलं-लसूण घालून हलकं परता. त्यानंतर कांदा, गाजर, शिमला मिरची आणि कोबी अशा सर्व भाज्या घालून त्या किंचित मऊ होतील, पण कुरकुरीतपणा टिकून राहील इतपत परतून घ्या.

आता यात शेजवान सॉस, सोया सॉस, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून सगळं साहित्य नीट मिसळा. शेवटी कुरकुरीत तळलेले चपातीचे नूडल्स कढईत घालून हलक्या हाताने मिक्स करा. झाकण ठेवून एक-दोन मिनिटं वाफ येऊ द्या.

अशा पद्धतीने उरलेल्या चपात्यांपासून तयार झालेली चटपटीत चायनीज भेळ गरमागरम सर्व्ह करा. वरून कांद्याची पात किंवा थोडी शेजवान चटणी घातल्यास चव आणखी खुलते.

उपयुक्त टिप्स :

  • चपात्या फारच कडक झाल्या असतील तर त्या कुरकुरीत करताना जळण्याची शक्यता असते.

  • चपातीचे पट्टे तळताना तेल जास्त गरम करू नका; मध्यम आचेवर तळल्यास ते समप्रमाणात कुरकुरीत होतात.

  • अधिक हेल्दी पर्याय हवा असल्यास चपातीचे नूडल्स डीप फ्राय न करता एअर फ्रायर किंवा तव्यावर थोड्याशा तेलात भाजू शकता.

  • लहान मुलांसाठी बनवत असाल तर शेजवान सॉसचे प्रमाण कमी ठेवा किंवा कमी तिखट सॉस वापरा.

उरलेल्या चपात्यांचं काय कराल? मुलांसाठी झटपट तयार करा चटपटीत चायनीज भेळ
शाळेतून आल्यावर चटपटीत खाऊची फरमाइश?मुलांसाठी घरीच बनवा बटाट्याचे खुसखुशीत फ्रेंच फ्राईज
  • भाज्या फार वेळ परतू नका; त्या थोड्या कुरकुरीत राहिल्या तर भेळीची चव अधिक छान लागते.

  • चवीत बदल हवा असल्यास शेवटी थोडं टोमॅटो सॉस किंवा व्हिनेगरचे काही थेंब घालू शकता.

  • भेळ बनवून लगेचच सर्व्ह करा, नाहीतर चपातीचे नूडल्स मऊ पडतात आणि कुरकुरीपणा कमी होतो.

logo
marathi.freepressjournal.in