शाळेतून आल्यावर चटपटीत खाऊची फरमाइश?मुलांसाठी घरीच बनवा बटाट्याचे खुसखुशीत फ्रेंच फ्राईज

शाळेतून घरी आल्यानंतर मुलांची पहिलीच मागणी असते "काहीतरी चटपटीत हवं!" अशावेळी मोजकं साहित्य, सोपी कृती आणि लगेच तयार होणारा हा नाश्ता संध्याकाळची भूक आणि मन दोन्ही तृप्त करतो.
शाळेतून आल्यावर चटपटीत खाऊची फरमाइश?मुलांसाठी घरीच बनवा बटाट्याचे खुसखुशीत फ्रेंच फ्राईज
शाळेतून आल्यावर चटपटीत खाऊची फरमाइश?मुलांसाठी घरीच बनवा बटाट्याचे खुसखुशीत फ्रेंच फ्राईजछायाचित्र : पिंटरेस्ट
Published on

शाळेतून घरी आल्यानंतर मुलांची पहिलीच मागणी असते "काहीतरी चटपटीत हवं!" अशावेळी बाहेरचे वेफर्स, पॅकेटमधले स्नॅक्स देण्याऐवजी जर घरच्या घरी झटपट, स्वच्छ आणि चविष्ट काही बनवलं तर? बटाट्याचे फ्रेंच फ्राईज हा असा पर्याय आहे जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. कमी साहित्य, सोपी कृती आणि लगेच तयार होणारा हा नाश्ता संध्याकाळची भूक आणि मन दोन्ही तृप्त करतो.

साहित्य

  • बटाटे - आवश्यकतेनुसार

  • थंड पाणी

  • मीठ - चवीनुसार

  • कॉर्नफ्लोर - १ ते २ चमचे

  • आवडता मसाला (ऐच्छिक)

  • तेल - तळण्यासाठी

शाळेतून आल्यावर चटपटीत खाऊची फरमाइश?मुलांसाठी घरीच बनवा बटाट्याचे खुसखुशीत फ्रेंच फ्राईज
जेवणात चार घास जास्तच जातील; झटपट बनवा 'हे' मिक्स भाज्यांचे आंबटगोड लोणचं

कृती :

सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्यावेत आणि उभे, सारख्या जाडीचे काप करावेत. कापलेले बटाटे साधारण १५ ते २० मिनिटे थंड पाण्यात भिजत ठेवावेत, यामुळे त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जातो. त्यानंतर बटाटे पाण्यातून काढून स्वच्छ कापडावर किंवा किचन टॉवेलवर पसरवून पूर्णपणे कोरडे करून घ्यावेत. कोरडे झालेले बटाटे एका ताटात घेऊन त्यावर चवीनुसार मीठ आणि कॉर्नफ्लोर घालून हलक्या हाताने सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यावे. कढईमध्ये तेल गरम करून त्यात बटाटे थोडेथोडे करून सोडावेत आणि मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत. छान खुसखुशीत झाले की फ्रेंच फ्राईज तेलातून काढून घ्यावेत.

टिप्स :

  • फ्रेंच फ्राईज अधिक खुसखुशीत हवे असतील तर तळताना तेल खूप गरम असणं महत्त्वाचं आहे.

  • लहान मुलांसाठी तिखट मसाले टाळा; हवं असल्यास थोडा चाट मसाला किंवा चीज पावडर घालू शकता.

शाळेतून आल्यावर चटपटीत खाऊची फरमाइश?मुलांसाठी घरीच बनवा बटाट्याचे खुसखुशीत फ्रेंच फ्राईज
'आज डब्यात काय?' चा प्रश्न मिटला! १० मिनिटांत तयार होणारा कांदा-कोथिंबीर पराठा
  • हेल्दी पर्याय हवा असेल तर हेच फ्राईज एअर फ्रायरमध्येही बनवता येतात.

घरच्या घरी बनवलेले हे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज मुलांचा आवडता संध्याकाळचा नाश्ता ठरतील, यात शंका नाही!

logo
marathi.freepressjournal.in