

लिपस्टिक हा अनेक महिलांच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग आहे. पण चुकीच्या पद्धतीने लिपस्टिक वापरली किंवा सतत लिपस्टिकचा वापर केला तर ओठ कोरडे पडतात. यामुळे ओठांना जळजळ होऊ शकते, अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो किंवा ओठ काळेही होऊ शकतात. त्यामुळे लिपस्टिक लावताना काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो करायला हव्यात.
1. आधी ओठ मॉइश्चराइज करा
लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बाम किंवा नारळ तेल लावा. यामुळे ओठ कोरडे पडत नाहीत आणि लिपस्टिक स्मूथ दिसते.
2. एक्सपायरी डेट तपासा
जुनी किंवा एक्सपायर झालेली लिपस्टिक वापरू नका. अशा लिपस्टिकमुळे ओठांना अॅलर्जी होऊ शकते.
3. दर्जेदार आणि ब्रँडेड लिपस्टिक वापरा
स्वस्त आणि अनोळखी ब्रँडच्या लिपस्टिकमध्ये हानिकारक केमिकल्स असू शकतात. शक्यतो ISI/डर्मॅटोलॉजिकल टेस्टेड प्रॉडक्ट्स वापरा.
4. खूप वेळ लिपस्टिक ठेवू नका
संपूर्ण दिवस लिपस्टिक ठेवणे टाळा. घरी आल्यानंतर सौम्य मेकअप रिमूव्हरने लिपस्टिक काढा.
5. ओठांची नियमित स्वच्छता करा
आठवड्यातून एक-दोन वेळा सौम्य स्क्रबने ओठ साफ करा. यामुळे मृत त्वचा निघून जाते.
6. मॅट लिपस्टिकचा अति वापर टाळा
मॅट लिपस्टिक ओठ अधिक कोरडे करू शकते. मधूनमधून क्रीमी किंवा हायड्रेटिंग लिपस्टिक वापरणे फायदेशीर ठरते.
7. लिपस्टिक शेअर करू नका
इतरांची लिपस्टिक वापरणे किंवा स्वतःची लिपस्टिक शेअर करणे टाळा. यामुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो.
8. नैसर्गिक घटक असलेली लिपस्टिक निवडा
अॅलोवेरा किंवा व्हिटॅमिन ई असलेली लिपस्टिक ओठांसाठी सुरक्षित मानली जाते.
टीप : ओठांवर सतत जळजळ, सूज किंवा रंग बदल जाणवत असल्यास लिपस्टिक वापरणे थांबवून त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. सौंदर्यासाठी लिपस्टिक महत्त्वाची असली तरी ओठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको. योग्य काळजी घेतल्यास ओठ सुंदर, मऊ आणि निरोगी राहतील.
(या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)