Maharashtra Din 2026 : "प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा"; महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या मित्र-परिवाराला आणि प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश. "प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा" म्हणत साजरा करा अभिमानाचा दिवस.
Maharashtra Din 2026  : "प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा" महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा
Maharashtra Din 2026 : "प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा" महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

१ मे हा दिवस महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि अस्मितेचा मानला जातो. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यानंतर महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना झाली. तेव्हापासून दरवर्षी १ मे हा दिवस 'महाराष्ट्र दिन' म्हणून उत्साहात साजरा केला जातो. मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, कष्ट, स्वाभिमान आणि प्रगतीचा गौरव करणारा हा दिवस प्रत्येक मराठी मनासाठी खास असतो.

यंदा महाराष्ट्र दिनानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देण्याची परंपराही अधिक रंगतदार झाली आहे. व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम स्टोरी किंवा खास मेसेजद्वारे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा पाठवून हा अभिमानाचा दिवस अधिक खास करता येऊ शकतो. 'प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' म्हणत आपल्या मातीचा, भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान व्यक्त करण्यासाठी हे खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.

महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा

१. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...
माय मराठी, संतांची परंपरा आणि शूर वीरांची भूमी लाभलेल्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

२. कणखर सह्याद्री, संतांची शिकवण आणि मराठी मातीचा अभिमान...
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

३. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!
महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

४. शिवरायांचा वारसा, फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार आणि संतांची शिकवण लाभलेल्या महाराष्ट्राला मानाचा मुजरा! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

५. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राची अस्मिता जपूया...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Maharashtra Din 2026  : "प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा" महाराष्ट्र दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा
Maharashtra Din 2026 : १ मे यादिवशीच महाराष्ट्र दिन का साजरा करतात? जाणून घ्या इतिहास

६. सह्याद्रीच्या कणखरतेला, कोकणाच्या सौंदर्याला आणि मराठी मनाच्या साधेपणाला सलाम!
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

७. हीच आमुची प्रार्थना, हीच आमुची शान...महाराष्ट्राची अस्मिता सदैव राहो महान!
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

८. संतांची भूमी, शूरवीरांची माती आणि कष्टकऱ्यांची शान...अशा महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

९. महाराष्ट्र म्हणजे परंपरा, विचार, संघर्ष आणि स्वाभिमान!
या महान भूमीला स्मरून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१०. महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषेचा गोडवा आणि सह्याद्रीचा अभिमान कायम राहो...
आपणास व आपल्या परिवारास महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

११. भीति न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा, दरीदरीतुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

logo
marathi.freepressjournal.in