नमकीन खायची सारखी इच्छा होतेय? पण 'हे' धोके माहितीयेत का?

नमकीनमध्ये असलेलं जास्त मीठ आणि तेल हे आरोग्यासाठी मुख्य धोका ठरू शकतात. चवीसाठी घातलेलं मीठ शरीरात सोडियमचं प्रमाण वाढवतं, तर डीप फ्रायमुळे शरीरात अनावश्यक चरबी जमा होते.
नमकीन खायची सारखी इच्छा होतेय? पण 'हे' धोके माहितीयेत का?
नमकीन खायची सारखी इच्छा होतेय? पण 'हे' धोके माहितीयेत का? छायचित्र : पिंटरेस्ट
Published on

चहा, कॉफी किंवा संध्याकाळची हलकी भूक… अशा वेळी हात आपोआप नमकीनकडे जातो. कुरकुरीत चव, मसाल्यांचा झणझणीत तडका आणि पटकन मिळणारा पर्याय म्हणून नमकीन अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलं आहे. पण हीच सवय जर रोजची झाली, तर त्याचे परिणाम शरीरावर हळूहळू दिसू लागतात.

नमकीनमध्ये असलेलं जास्त मीठ आणि तेल हे आरोग्यासाठी मुख्य धोका ठरू शकतात. चवीसाठी घातलेलं मीठ शरीरात सोडियमचं प्रमाण वाढवतं, तर डीप फ्रायमुळे शरीरात अनावश्यक चरबी जमा होते.

नमकीन खायची सारखी इच्छा होतेय? पण 'हे' धोके माहितीयेत का?
वजन कमी करताय? 'हा' हेल्दी पालक-पनीर राइस तुमच्या डाएटसाठी परफेक्ट!

वारंवार नमकीन खाल्ल्याने होणारे संभाव्य दुष्परिणाम :

  • शरीरात सोडियमचं प्रमाण वाढून ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका

  • पाय, चेहरा किंवा हातांवर सूज येणं

  • कोलेस्ट्रॉल वाढणं आणि हृदयावर ताण

  • सतत थकवा, डोकेदुखी जाणवणं

  • ॲसिडिटी, गॅस, अपचन यांसारख्या पचनसंस्थेच्या तक्रारी

आजकाल बाजारात मिळणाऱ्या अनेक नमकीन प्रकारांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज, कृत्रिम रंग आणि फ्लेवर वापरले जातात. हे घटक चव वाढवतात खरे, पण दीर्घकाळ सेवन केल्यास ते आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्धांनी याबाबत अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

मात्र याचा अर्थ नमकीन पूर्णपणे बंद करायलाच हवं असं नाही. महत्त्वाचं आहे ते प्रमाण आणि योग्य पर्याय निवडणं. रोजच्या सवयीऐवजी कधीतरी, तेही मर्यादित प्रमाणात नमकीन खाल्लं, तर फारसा धोका राहत नाही.

नमकीनऐवजी निवडता येतील हे हेल्दी पर्याय :

  • भाजलेले चणे किंवा हरभरे

  • मुरमुरे किंवा पोहे चिवडा (कमी तेलात)

  • मखाणे (फॉक्स नट्स)

  • ओट्स किंवा कॉर्नफ्लेक्सपासून बनवलेला घरगुती चिवडा

  • भाजलेले किंवा बेक केलेले स्नॅक्स

नमकीन खायची सारखी इच्छा होतेय? पण 'हे' धोके माहितीयेत का?
PCOS ने त्रस्त आहात? 'या' योगासनांनी मिळेल नैसर्गिक आराम

थोडक्यात सांगायचं झालं, तर चव आणि आरोग्य यांचा समतोल राखणं हीच खरी स्मार्ट लाइफस्टाइल आहे. आज छोटा बदल केला, तर उद्या मोठ्या आजारांपासून स्वतःला दूर ठेवता येऊ शकतं. नमकीनची सवय कमी करून हेल्दी पर्याय स्वीकारणं, हाच निरोगी आयुष्याकडे नेणारा योग्य मार्ग आहे.

(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in