

कृत्रिम एअर फ्रेशनरचा वास कितीही छान असला तरी तो नैसर्गिक फुलांच्या सुगंधाशी तुलना करू शकत नाही. हलका, ताजा आणि घरभर पसरत राहणारा हा नैसर्गिक सुगंध तुमच्या घरात आनंदी आणि प्रसन्न वातावरण निर्मिती करतो. एक फूलदाणी असो किंवा खिडकीजवळ ठेवलेलं छोटे पॉटेड प्लांट ही नैसर्गिक फुले तुमच्या घरातील वाईब चेंज करण्यासाठी परफेक्ट आहेत,
गुलाबाचा सौम्य पण उठावदार सुगंध कोणत्याही खोलीचं वातावरण आनंदी आणि ताजंतवानं करतो. इंग्लिश गुलाब, जुने देसी गुलाब किंवा चहाचे गुलाब हे प्रकार विशेष सुगंधी मानले जातात. डायनिंग टेबल, किचन काउंटर किंवा बेडसाइडवर ठेवलेला गुलाबांचा गुच्छ घरभर सौंदर्य आणि सुगंध दोन्ही पसरवतो.
लॅव्हेंडर घरातील वातावरण शांत, सुगंधी आणि आनंददायी बनवतो. हलक्या उन्हात ठेवलेलं छोटं पॉटेड लॅव्हेंडर प्लांट खिडकीजवळ, बेडरूममध्ये किंवा वर्क डेस्कवर अप्रतिम दिसतं. त्याचा सुवास घरात एक साधी पण ताजीतवानी हवा निर्माण करतो.
निशीगंधाचा सुगंध संध्याकाळची वेळ जवळ आली की आणखी गडद, मोहक होत जातो. व्हेसमध्ये ठेवलेला एक गुच्छ लिव्हिंग रूमला क्षणात सुगंधी करतो. फुलं एका वाटीत पाण्यावर तरंगत ठेवणं हा देखील एक सुंदर पर्याय आहे. फक्त यासाठी पाणी नेहमी स्वच्छ ठेवा.
मोगऱ्याचा सुगंध इतका स्वच्छ आणि प्रसन्न असतो की काहीच फुले संपूर्ण खोलीला सुवासिक करतात. खिडकीजवळ ठेवलेला छोटासा कुंडा किंवा छोट्या वाटीत ठेवलेल्या मोगऱ्याच्या कळ्या दोन्ही घराला ताजेतवाने ठेवतात. ह्याचे झाड उजेडात चांगले वाढते.