शारदीय नवरात्रोत्सवाला अवघ्या दोन दिवसांत सुरुवात होत आहे. महिलांची नवरात्रीसाठी अगदी कपड्यांपासून ते उपवासापर्यंत खास लगबग सुरू असते. त्यातही उपवासासाठी रोज काय नवीन करायचं हा प्रश्न असतोच. अशावेळी वेळ वाचवणारा आणि तितकाच पौष्टिक पदार्थ फार उपयोगी ठरतो. साबुदाणा, बटाटे, वरी, शेंगदाणे खाऊन कंटाळा आलाय का? तर, रताळ्याची कापं तुम्हाला देईल वेगळेपण आणि चव दोन्हीचा अनुभव.
रताळी - २
साखर - २ चमचे
तूप - २ टेबलस्पून
ड्रायफ्रुट्स - आवश्यक तेवढे, काप करून
वेलची पूड - चवीनुसार
रताळी स्वच्छ धुवून साल काढा आणि त्याचे गोल काप करून घ्या. एका कढईत तूप गरम करून त्यात रताळ्याचे काप टाका. झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ काढा. त्यानंतर त्यात साखर आणि वेलची पूड घालून चांगले मिक्स करा. रताळ्याचे काप आणखी पाच ते सहा मिनिटे हलक्या आचेवर परतून घ्या. शेवटी ड्रायफ्रूट्स घालून गरम गरम सर्व्ह करा.