Navratri 2026 : उपवासात खा चविष्ट मसाला डोसा; रणवीर ब्रार यांची सोपी रेसिपी पाहा

उपवासाचे नियम प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे साहित्य निवडताना आपल्या उपवासाच्या पद्धतीनुसार काळजी घ्यावी.
Navratri 2026 : उपवासात खा चविष्ट मसाला डोसा; रणवीर ब्रार यांची सोपी रेसिपी पाहा
Navratri 2026 : उपवासात खा चविष्ट मसाला डोसा; रणवीर ब्रार यांची सोपी रेसिपी पाहा
Published on: 

नवरात्रीच्या नऊ दिवसांत उपवास करणारे अनेकजण फराळासाठी वेगवेगळे पदार्थ शोधत असतात. नेहमीच्या साबुदाणा खिचडी आणि बटाट्याच्या पदार्थांपेक्षा काहीतरी वेगळं चाखायचं असेल, तर प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार यांची 'व्रत स्पेशल मसाला डोसा' रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. वरीचे तांदूळ (भगर) आणि साबुदाण्यापासून तयार होणारा हा डोसा दोन प्रकारच्या चटण्यांसोबत सर्व्ह करता येतो.

Navratri 2026 : उपवासात खा चविष्ट मसाला डोसा; रणवीर ब्रार यांची सोपी रेसिपी पाहा
Navratri 2026 : उपवासासाठी बनवा चविष्ट अन् हेल्दी पदार्थ; पाहा सोप्या रेसिपी
Navratri 2026 : उपवासात खा चविष्ट मसाला डोसा; रणवीर ब्रार यांची सोपी रेसिपी पाहा
नेहमीची इडली विसरा! एकदा ट्राय करा चटपटीत बटाटा-रवा इडली

उपवासासाठी खास मसाला डोसा

रणवीर ब्रार यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर या खास डोसाची रेसिपी शेअर केली आहे. उपवासात खाता येतील अशा पदार्थांचा वापर करून तयार केलेला हा डोसा चविष्ट आणि कुरकुरीत होतो. डोशासोबत बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची तसेच नारळाची चटणी दिली जाते. त्यामुळे उपवासाच्या फराळात वेगळेपणा आणण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

डोसा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

यासाठी वरीचे तांदूळ (भगर), साबुदाणा, तूप, दही आणि पाणी यांची आवश्यकता असते. बटाट्याच्या भाजीसाठी उकडलेले बटाटे, जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, काजू, शेंगदाणा तेल आणि सैंधव मीठ वापरले जाते. उपवासाचे नियम प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे साहित्य निवडताना आपल्या उपवासाच्या पद्धतीनुसार काळजी घ्यावी.

Navratri 2026 : उपवासात खा चविष्ट मसाला डोसा; रणवीर ब्रार यांची सोपी रेसिपी पाहा
बाजारातून विकत आणण्याची गरज नाही; घरच्या घरी काही मिनिटांत बनवा मॅगी मसाला

दोन प्रकारच्या चटण्यांमुळे वाढेल चव

१. शेंगदाण्याची चटणी : भाजलेले शेंगदाणे, दही, हिरवी मिरची आणि भाजलेले जिरे एकत्र करून ही चटणी तयार केली जाते. डोशासोबत ही चटणी छान लागते.

२. नारळाची चटणी : ताजे खोबरे, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडा लिंबाचा रस वापरून नारळाची चटणी बनवता येते. या चटणीमुळे डोशाची चव आणखी खुलते.

कसा तयार कराल व्रत स्पेशल मसाला डोसा?

सर्वप्रथम वरीचे तांदूळ (भगर) आणि साबुदाणा तुपामध्ये हलके भाजून घ्यावा. त्यानंतर हे मिश्रण दही आणि पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. तयार झालेले पीठ गरम तव्यावर डोशाच्या आकारात पसरवून घ्यावे आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत भाजावे.

Navratri 2026 : उपवासात खा चविष्ट मसाला डोसा; रणवीर ब्रार यांची सोपी रेसिपी पाहा
Navratri 2026 : उकडलेल्या रताळ्यांना द्या कुरकुरीत ट्विस्ट; उपवासासाठी 'असा' बनवा झटपट चाट

दुसरीकडे, कढईत शेंगदाणा तेल गरम करून त्यात जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि काजू घालावेत. त्यानंतर उकडलेले बटाटे आणि सैंधव मीठ घालून भाजी तयार करावी. भाजलेला डोसा या बटाट्याच्या भाजीने भरून घ्यावा आणि शेंगदाण्याची व नारळाची चटणी सोबत सर्व्ह करावी.

कमी वेळेत तयार होणारा चविष्ट फराळ

या रेसिपीसाठी साधारण १० मिनिटे पूर्वतयारी आणि २० ते २५ मिनिटे स्वयंपाकासाठी लागतात. त्यामुळे नवरात्रीच्या उपवासात नेहमीच्या फराळाला चविष्ट पर्याय म्हणून हा मसाला डोसा घरी तयार करता येईल. मात्र, वरीचे तांदूळ (भगर) आणि साबुदाणा यांसारखे घटक आपल्या उपवासात चालतात याची खात्री करूनच ही रेसिपी बनवावी.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in