

उन्हाळ्यात थंडगार आईस्क्रीम किंवा चुस्की खाण्याची मजा काही वेगळीच असते. मात्र जास्त साखर आणि कृत्रिम फ्लेवर्समुळे आरोग्याची चिंता वाढते. अशावेळी घरच्या घरी बनवलेले 'नो शुगर वॉटरमेलन-कोकोनट आईस कँडी' हा एक हेल्दी आणि टेस्टी पर्याय ठरू शकतो.
कलिंगड, डाळिंब, नारळपाणी आणि चिया सीड्सपासून तयार होणारी आईस कँडी शरीराला थंडावा देण्यासोबतच हायड्रेट ठेवण्यास मदत करते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही समर स्पेशल रेसिपी काही मिनिटांत तयार होते.
साहित्य :
२ कप कलिंगडाचे तुकडे
१/२ कप डाळिंब
१ नारळाचे पाणी
काही पुदिन्याची पाने
१ टीस्पून भिजवलेले चिया सीड्स
चवीनुसार काळं मीठ
१/४ टीस्पून भाजलेले जिरं पावडर
२ लिंबांचा रस
जलजीरा मसाला (सर्व्ह करण्यासाठी)
कृती :
Step 1 : फ्रूट मिक्स तयार करा
मिक्सरमध्ये कलिंगड, डाळिंब, नारळपाणी आणि पुदिन्याची पाने घालून स्मूथ ब्लेंड करा. तयार मिश्रण गाळून घ्या.
Step 2 : फ्लेवर वाढवा
आता त्यात भिजवलेले चिया सीड्स, काळं मीठ, भाजलेले जिरं पावडर आणि लिंबाचा रस घालून नीट मिक्स करा.
Step 3 : फ्रीजमध्ये सेट करा
तयार मिश्रण आईस कँडी मोल्ड्समध्ये किंवा छोट्या कपांमध्ये ओता. ४ ते ५ तास फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
Step 4 : थंडगार सर्व्ह करा
आईस कँडी तयार झाल्यानंतर वरून थोडासा जलजीरा मसाला शिंपडून सर्व्ह करा.
टिप्स :
अधिक नैसर्गिक गोडवा हवा असल्यास थोडे मध घालू शकता.
पुदिन्याची पाने जास्त घातल्यास अधिक फ्रेश फ्लेवर मिळतो.
पॉप्सिकल्स अधिक रंगीत दिसण्यासाठी डाळिंबाचे दाणे तसेच घालू शकता.
चिया सीड्समुळे पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात बाजारातील साखरयुक्त आईस्क्रीमऐवजी घरच्या घरी बनवा हेल्दी वॉटरमेलन-कोकोनट आईस कँडी आणि थंडगार चवीचा आनंद घ्या.