उकाड्यात थंडावा हवा? पान-गुलकंद सरबत ठरेल परफेक्ट हेल्दी ड्रिंक

उन्हाळ्यात उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी पान-गुलकंद सरबत हा एक नैसर्गिक आणि हेल्दी पर्याय ठरू शकतो. घरच्या घरी सहज तयार होणारे हे सरबत शरीराला थंडावा देण्यासोबतच पचन सुधारण्यासही मदत करते.
उकाड्यात थंडावा हवा? पान-गुलकंद सरबत ठरेल परफेक्ट हेल्दी ड्रिंक
उकाड्यात थंडावा हवा? पान-गुलकंद सरबत ठरेल परफेक्ट हेल्दी ड्रिंक
Published on

उन्हाळा सुरू झाला की उकाडा अक्षरशः असह्य होतो. दिवसभर बाहेर फिरल्यानंतर घशाला काहीतरी थंडगार, ताजेतवाने पेय हवंसं वाटतं. अशावेळी अनेकजण कोल्डड्रिंक किंवा पॅक ज्यूसकडे वळतात, मात्र हे पर्याय शरीरासाठी नेहमीच फायदेशीर नसतात. याऐवजी घरच्या घरी बनवलेलं नैसर्गिक पेय अधिक चांगला पर्याय ठरतो. असंच एक चवदार आणि आरोग्यदायी पेय म्हणजे पान-गुलकंद सरबत.

विड्याच्या पानांचा हलका सुगंध आणि गुलकंदाचा गोड, थंडावा देणारा स्वाद यामुळे हे सरबत उन्हाळ्यात विशेष ठरते. शरीरातील उष्णता कमी करण्यासोबतच पचन सुधारण्यासाठीही हे पेय उपयुक्त ठरते. बाहेरून घरी आल्यावर किंवा दुपारच्या उन्हात थकल्यावर एक ग्लास हे सरबत प्यायलं की लगेच ताजेतवाने वाटतं.

उकाड्यात थंडावा हवा? पान-गुलकंद सरबत ठरेल परफेक्ट हेल्दी ड्रिंक
उष्णतेचा त्रास वाढलाय? घरी बनवा थंडगार 'मसाला ताक'; पचनालाही होईल मदत

साहित्य :
३ ते ४ विड्याची पाने
२ चमचे गुलकंद
१ चमचा बडीशेप
चिमूटभर वेलची पावडर
१ ते २ चमचे साखर किंवा मध
१ ग्लास थंड दूध
बर्फाचे तुकडे

कृती :
सर्वप्रथम विड्याची पाने स्वच्छ धुवून छोटे तुकडे करून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये ही पाने, बडीशेप, वेलची पावडर आणि साखर घालून बारीक वाटून घ्या.

यानंतर या मिश्रणात गुलकंद, थंड दूध आणि बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा चांगले ब्लेंड करा.

तयार सरबत ग्लासात ओतताना ग्लासाच्या कडेला थोडा मध लावल्यास चव अधिक वाढते. वरून थोडा गुलकंद घालून सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.

उकाड्यात थंडावा हवा? पान-गुलकंद सरबत ठरेल परफेक्ट हेल्दी ड्रिंक
उकाड्यात शरीराला मिळेल थंडावा; दूध, कलिंगड आणि सब्जापासून बनवा 'मोहब्बत का शरबत'

का आहे खास?
हे सरबत केवळ चविष्टच नाही, तर शरीराला थंडावा देण्यास मदत करते. पोटातील जळजळ कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यासही हे उपयुक्त ठरते. त्यामुळे या उन्हाळ्यात बाहेरचं पेय टाळून घरच्या घरी हे हेल्दी आणि टेस्टी पान-गुलकंद सरबत नक्की ट्राय करा.

logo
marathi.freepressjournal.in