

प्रत्येक EPF खाते असलेल्या कर्मचाऱ्यासाठी Universal Account Number (UAN) अत्यंत महत्त्वाचा असतो. PF बॅलन्स तपासणे, पैसे काढणे, खाते ट्रान्सफर करणे किंवा इतर ऑनलाइन EPFO सेवा वापरण्यासाठी UAN सक्रिय असणे आवश्यक आहे. जर तुमचा UAN अद्याप ॲक्टिव्ह नसेल, तर तो काही मिनिटांत मोबाईलवरूनही सक्रिय करता येतो.
UAN म्हणजे काय?
UAN (Universal Account Number) हा EPFO कडून प्रत्येक सदस्याला दिला जाणारा १२ अंकी कायमस्वरूपी क्रमांक आहे. नोकरी बदलली तरी UAN तोच राहतो. नवीन Member ID या UAN शी जोडला जातो.
UAN सक्रिय करणे का गरजेचे आहे?
UAN सक्रिय असल्यास तुम्ही पुढील सेवा सहज वापरू शकता.
PF बॅलन्स तपासणे
EPF पासबुक डाउनलोड करणे
ऑनलाइन PF क्लेम दाखल करणे
PF खाते ट्रान्सफर करणे
KYC अपडेट करणे
नॉमिनीची माहिती अपडेट करणे
UMANG ॲपद्वारे UAN कसे सक्रिय कराल?
सर्वप्रथम मोबाईलमध्ये UMANG App डाउनलोड करा.
ॲपमध्ये EPFO शोधा.
'UAN Services Through Face Auth' हा पर्याय निवडा.
त्यानंतर 'UAN Activation' वर क्लिक करा.
तुमचा १२ अंकी UAN, आधार क्रमांक आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका.
Send OTP वर क्लिक करून OTP पडताळणी पूर्ण करा.
त्यानंतर मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने Face Authentication पूर्ण करा.
पडताळणी यशस्वी झाल्यानंतर तुमचा UAN सक्रिय होईल आणि तात्पुरता पासवर्ड SMS द्वारे मिळेल.
UAN सक्रिय करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
१२ अंकी UAN
आधार क्रमांक
आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
स्मार्टफोन आणि इंटरनेट
Face Authentication साठी कॅमेरा
हे गोष्ट लक्षात ठेवा
UAN सक्रिय नसल्यास EPFO च्या अनेक ऑनलाइन सेवा वापरण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे EPF खातेधारकांनी शक्य तितक्या लवकर UAN सक्रिय करून KYC देखील पूर्ण करावे.