चविष्ट नाश्त्यासाठी परफेक्ट! पिझ्झा स्टाईल ऑम्लेट अवघ्या २० मिनिटांत तयार

सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅकसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. अवघ्या २० मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
चविष्ट नाश्त्यासाठी परफेक्ट! पिझ्झा स्टाईल ऑम्लेट अवघ्या २० मिनिटांत तयार
चविष्ट नाश्त्यासाठी परफेक्ट! पिझ्झा स्टाईल ऑम्लेट अवघ्या २० मिनिटांत तयार'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

पिझ्झा खायला तर आवडतो, पण तो रोज खाणे शक्य नसते. अशावेळी पिझ्झाची चव कोणत्यातरी घरगुती पदार्थात मिळाली, तर? पिझ्झा ऑम्लेट ही अशीच झटपट आणि चवदार रेसिपी आहे. अंडी, चीज, मशरूम आणि आवडीच्या भाज्यांपासून तयार होणारा हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅकसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. अवघ्या २० मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.

चविष्ट नाश्त्यासाठी परफेक्ट! पिझ्झा स्टाईल ऑम्लेट अवघ्या २० मिनिटांत तयार
Healthy Breakfast : कुरकुरीत मूगडाळ टोस्ट; सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट रेसिपी

साहित्य :

  • ४ अंडी

  • ५० ग्रॅम मशरूम (स्लाइस केलेले)

  • २ टीस्पून ऑलिव्ह ऑइल

  • अर्धा टीस्पून ओरिगेनो

  • अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स

  • २ ते ३ ऑलिव्ह (काप केलेले)

  • १०० ग्रॅम किसलेले चीज

  • २ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा

  • चवीनुसार मीठ

  • चवीनुसार काळी मिरी पावडर

  • १ टेबलस्पून टोमॅटो केचप

  • १ टेबलस्पून पास्ता सॉस

चविष्ट नाश्त्यासाठी परफेक्ट! पिझ्झा स्टाईल ऑम्लेट अवघ्या २० मिनिटांत तयार
रोजच्या भाजीला हटके ट्विस्ट! घरच्या घरी बनवा 'क्रीमी गार्लिक मशरूम-पालक'; वाचा रेसिपी

कृती :

भाज्या परतून घ्या - कढईत एक टीस्पून ऑलिव्ह ऑइल गरम करा. त्यात कांदा आणि मशरूम घालून ५ मिनिटे परता. शिजल्यानंतर बाजूला काढून ठेवा.

अंड्याचे मिश्रण तयार करा - एका भांड्यात अंडी फोडून त्यात ओरिगेनो, चिली फ्लेक्स, मीठ आणि काळी मिरी पावडर घालून चांगले फेटून घ्या.

ऑम्लेट तयार करा - त्याच पॅनमध्ये उरलेले ऑलिव्ह ऑइल घालून अंड्याचे मिश्रण ओता. दोन्ही बाजूंनी २ ते ३ मिनिटे शिजवा.

चविष्ट नाश्त्यासाठी परफेक्ट! पिझ्झा स्टाईल ऑम्लेट अवघ्या २० मिनिटांत तयार
Breakfast Recipe : हेल्दी, टेस्टी आणि झटपट; सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा शेवई उपमा

पिझ्झा टॉपिंग लावा - ऑम्लेटवर टोमॅटो केचप आणि पास्ता सॉस पसरवा. त्यानंतर परतलेले मशरूम, कांदा, ऑलिव्ह आणि भरपूर किसलेले चीज घाला.

चीज वितळवा - ऑम्लेट ओव्हनमध्ये किंवा झाकण ठेवून काही मिनिटे शिजवा, जोपर्यंत चीज छान वितळून हलके सोनेरी होत नाही.

गरमागरम सर्व्ह करा - तयार पिझ्झा ऑम्लेट तुकडे करून गरमागरम सर्व्ह करा.

चविष्ट नाश्त्यासाठी परफेक्ट! पिझ्झा स्टाईल ऑम्लेट अवघ्या २० मिनिटांत तयार
भजी-पकोड्यांना द्या सुट्टी! यावेळी ट्राय करा खमंग क्रिस्पी फ्राईड फ्लॉवर

परफेक्ट पिझ्झा ऑम्लेटसाठी खास टिप्स :

  • रंगीत आणि चवदार बनवण्यासाठी शिमला मिरची, स्वीट कॉर्न किंवा टोमॅटो घालू शकता.

  • मोझरेला चीज वापरल्यास पिझ्झासारखा स्ट्रेची टेक्सचर मिळतो.

  • ऑम्लेट मंद आचेवर शिजवा, त्यामुळे ते मऊ आणि रसाळ राहते.

  • ओव्हन नसेल तर पॅनवर झाकण ठेवूनही चीज सहज वितळवू शकता.

  • तिखटपणा आवडीनुसार चिली फ्लेक्स कमी-जास्त करा.

  • टोमॅटो सॉसऐवजी पिझ्झा सॉस वापरल्यास चव आणखी खुलते.

चविष्ट नाश्त्यासाठी परफेक्ट! पिझ्झा स्टाईल ऑम्लेट अवघ्या २० मिनिटांत तयार
Sunday Special Recipe : बाजारासारखे क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न आता घरीच, वाचा सोपी रेसिपी

सर्व्हिंग सजेशन :

गरमागरम पिझ्झा ऑम्लेटवर थोडे ओरिगेनो आणि चिली फ्लेक्स भुरभुरून सर्व्ह करा. टोमॅटो केचप, गार्लिक डिप किंवा ताज्या सॅलडसोबत हा पदार्थ अधिक स्वादिष्ट लागतो. मुलांच्या टिफिनसाठी आणि वीकेंड ब्रेकफास्टसाठीही हा एक परफेक्ट पर्याय आहे.

logo
marathi.freepressjournal.in