लहानांसह मोठेही करतील फस्त; कपभर पोह्यापासून बनवा कुरकुरीत व्हेजिटेबल लॉलीपॉप!

गेल्या काही दिवसांपासून पोह्यांपासून तयार होणाऱ्या व्हेजिटेबल लॉलीपॉपची चर्चा रंगत आहे. मुलं असो की मोठे, सगळ्यांना हा कुरकुरीत, हेल्दी स्नॅक खूप आवडतो. झटपट बनवता येणारा हा व्हेजिटेबल लॉलीपॉप नुसता स्वादिष्ट नाही, तर पोषणाने भरलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया ही खास रेसिपी...
लहानांसह मोठेही करतील फस्त; कपभर पोह्यापासून बनवा कुरकुरीत व्हेजिटेबल लॉलीपॉप!
'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

गेल्या काही दिवसांपासून पोह्यांपासून तयार होणाऱ्या व्हेजिटेबल लॉलीपॉपची चर्चा रंगत आहे. मुलं असो की मोठे, सगळ्यांना हा कुरकुरीत, हेल्दी स्नॅक खूप आवडतो. झटपट बनवता येणारा हा व्हेजिटेबल लॉलीपॉप नुसता स्वादिष्ट नाही, तर पोषणाने भरलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया ही खास रेसिपी, ज्यामुळे मुलांचनाश्ता मजेदार आणि पौष्टिक होईल!

लहानांसह मोठेही करतील फस्त; कपभर पोह्यापासून बनवा कुरकुरीत व्हेजिटेबल लॉलीपॉप!
Aloo Tikki Recipe : चटपटीत आलू टिक्की! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट स्नॅक

साहित्य :

  • १ वाटी भिजवलेले पोहे

  • १/२ वाटी उकडलेला बटाटा, मॅश केलेला

  • मिक्स भाज्या - गाजर, फरसबी, कोबी, मटार (सर्व जाडसर वाटून घ्या)

  • कांदा - १ लहान, बारीक चिरलेला

  • कांद्याची पात, कोथिंबीर - चवीनुसार

  • मीठ - चवीनुसार

  • बारीक चिरलेलं आलं

  • हिरवी मिरची - १-२, बारीक चिरलेली

  • चाट मसाला, गरम मसाला, चिली फ्लेक्स - १/२ चमचा प्रत्येक

  • पांढरे तीळ - सजावटीसाठी

  • तेल - तळण्यासाठी

कृती:

सर्वप्रथम मोठ्या वाटीत भिजवलेले पोहे आणि मॅश केलेला बटाटा नीट मिक्स करा. मग मिक्सरमध्ये कांदा, गाजर, फरसबी, कोबी आणि उकडलेले मटार जाडसर वाटून घ्या आणि ही भाज्यांची पेस्ट पोहे-बटाट्याच्या मिश्रणात टाका. त्यात मीठ, बारीक चिरलेलं आलं, हिरवी मिरची, चाट मसाला, गरम मसाला, चिली फ्लेक्स, कांद्याची पात आणि कोथिंबीर घालून सर्व घटक नीट मिसळा. नंतर मिश्रणाचे छोटे गोळे तयार करून त्यावर स्टिक लावा आणि पांढरे तीळ शिंपडा. एका कढईत तेल गरम करून या लॉलीपॉप सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तळा. तळून झाल्यावर पेपर टॉवेलवर काढा, थोडं थंड झाल्यावर सर्व्ह करा आणि मुलं-मोठे सर्वजण आनंदाने खा.

लहानांसह मोठेही करतील फस्त; कपभर पोह्यापासून बनवा कुरकुरीत व्हेजिटेबल लॉलीपॉप!
स्नॅक टाइमला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट तयार होणारे प्रोटीनने भरलेले 'सोया पकोडे'

टिप्स:

  • पोहे नीट भिजवून घ्या, जास्त ओलसर नसावे, नाहीतर मिश्रण घट्ट होत नाही.

  • हवे असल्यास थोडे किसलेले चीज किंवा कॉर्नफ्लेक्स मिसळून लॉलीपॉपला आणखी कुरकुरीत बनवू शकता.

  • मुलांसाठी मसाले कमी ठेवणे उत्तम, पण चाट मसाला थोडा चव वाढवतो.

  • ह्या स्नॅकला पार्टी किंवा नाश्त्याला सर्व्ह करता येतो; घरच्या घरी बनवल्यामुळे पौष्टिकता आणि स्वाद दोन्ही टिकतात.

logo
marathi.freepressjournal.in