International Yoga Day 2026 : गर्भवती महिलांसाठी योगा किती सुरक्षित? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

योगा केल्याने तणाव कमी होण्यास, चांगली झोप लागण्यास आणि प्रसूतीसाठी मानसिक व शारीरिक तयारी होण्यास मदत होते.
International Yoga Day 2026 : गर्भवती महिलांसाठी योगा किती सुरक्षित? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
International Yoga Day 2026 : गर्भवती महिलांसाठी योगा किती सुरक्षित? वाचा तज्ज्ञांचा सल्ला 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

योग हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठीच नव्हे तर मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही उपयुक्त मानला जातो. गर्भावस्थेदरम्यान महिलांनी व्यायाम टाळावा, अशी समजूत अनेकांमध्ये असते. मात्र तज्ज्ञांच्या मते, योग्य मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षित पद्धतीने केला जाणारा योग गर्भवती महिला आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकतो.

गर्भावस्थेत योगाचे फायदे

स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. अर्चना धवन बजाज यांच्या मते, प्रेग्नन्सीदरम्यान प्री-नेटल योग केल्याने शरीराची लवचिकता वाढते, पाठदुखी कमी होते आणि शरीराचा पोश्चर सुधारतो. याशिवाय तणाव कमी होण्यास, चांगली झोप लागण्यास आणि प्रसूतीसाठी मानसिक व शारीरिक तयारी होण्यास मदत होते.

प्रत्येक टप्प्यात सर्व योगासने योग्य नसतात

गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे प्रत्येक योगासन सर्वच महिलांसाठी किंवा प्रत्येक त्रैमासिकासाठी (Trimester) योग्य असेलच असे नाही. त्यामुळे कोणतेही योगासन सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

योग सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

रक्तदाब, मधुमेह किंवा इतर वैद्यकीय गुंतागुंत असलेल्या महिलांनी कोणताही व्यायाम किंवा योग सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांची परवानगी घ्यावी.

कोणती काळजी घ्यावी?

पहिल्या त्रैमासिकानंतर जास्त वेळ पाठीवर झोपून योग करू नये. तसेच खोलवर वळणारी योगासने (Deep Twists) आणि पोटावर ताण देणारे व्यायाम टाळावेत. 'हॉट योगा' देखील टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात, कारण त्यामुळे शरीराचे तापमान वाढून निर्जलीकरणाचा धोका निर्माण होऊ शकतो.

International Yoga Day 2026 : गर्भवती महिलांसाठी योगा किती सुरक्षित? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
International Yoga Day 2026 : योगामुळे खरंच वजन कमी होतं का? वाचा तज्ज्ञांचे मत

संतुलन आणि श्वसनावर भर द्या

गर्भधारणेदरम्यान शरीराचे संतुलन बदलत असल्याने आधार घेऊन योग करणे अधिक सुरक्षित ठरते. तसेच नियंत्रित श्वसनक्रिया केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते आणि प्रसूतीच्या वेळीही त्याचा फायदा होऊ शकतो.

शरीराच्या मर्यादा ओळखा

गर्भावस्थेत शरीरावर जास्त ताण देणे टाळावे. पुरेसे पाणी प्यावे आणि कोणतीही अस्वस्थता जाणवल्यास योग थांबवावा. गर्भधारणा ही नवीन आणि कठीण व्यायाम प्रकारांची चाचणी घेण्याची वेळ नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.

International Yoga Day 2026 : गर्भवती महिलांसाठी योगा किती सुरक्षित? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
International Yoga Day 2026 : फक्त शरीरासाठी नाही, तर मेंदूसाठीही फायदेशीर ठरतो योगाभ्यास; वाचा तज्ज्ञांचे मत

ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा

योग करताना किंवा त्यानंतर रक्तस्राव, चक्कर येणे, छातीत दुखणे, तीव्र डोकेदुखी, प्रसूतीसारख्या कळा येणे किंवा बाळाच्या हालचाली कमी जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

योग ठरू शकतो निरोगी गर्भधारणेचा साथीदार

तज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने आणि आवश्यक काळजी घेऊन केला जाणारा योग हा निरोगी गर्भधारणेसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. योगाचा उद्देश केवळ कॅलरी बर्न करणे नसून शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारून दीर्घकालीन निरोगी जीवनशैली निर्माण करणे हा आहे.

logo
marathi.freepressjournal.in