सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत Potato Bites

Potato Bites बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून त्याची साल काढून बारीक मॅश करा. त्यानंतर ब्रेड...
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत Potato Bites
Published on

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना काहीतरी चविष्ट आणि टेस्टी खायला आवडतं. परंतु दररोज साध्या पदार्थांचा नाश्ता खाल्ल्यानंतर कंटाळा येतो. अशावेळी चमचमीत Potato Bites ही झटपट रेसिपी तुमच्या नाश्त्याला नवीन चव आणते. १० मिनिटांत तयार होणाऱ्या या पोटॅटो बाइट्सला चहा किंवा कॉफीसोबत खाल्ल्यावर संपूर्ण कुटुंबाचा दिवस सुरेख सुरू होतो.

साहित्य:

  • बटाटा – ३-४ मध्यम

  • ब्रेड – २ स्लाईस

  • तांदळाचे पीठ – २ टेबलस्पून

  • मीठ – चवीनुसार

  • हिरवी मिरची – २-३ बारीक चिरलेली

  • कोथिंबीर – २ टेबलस्पून बारीक चिरलेली

  • लाल तिखट – १ टीस्पून

  • चाट मसाला – १ टीस्पून

  • गरम मसाला – ½ टीस्पून

  • तेल – तळण्यासाठी

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत Potato Bites
Poha Pakoda Recipe : कंटाळवाण्या पोह्यांना द्या टेस्टी ट्विस्ट - झटपट पोहा पकोडे रेसिपी

कृती:

सर्वप्रथम बटाटे उकडून त्याची साल काढून बारीक मॅश करा. त्यानंतर ब्रेड पाण्यात मऊ होईपर्यंत भिजवून मॅश केलेल्या बटाट्यात मिसळा. मिश्रणात लाल तिखट, हिरवी मिरची, गरम मसाला, चाट मसाला आणि तांदळाचे पीठ घालून नीट मिक्स करा. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळून हलके हाताने ढवळा. तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून तेल लावलेल्या ताटावर पसरवून सुरीने तुकडे करा. नंतर गरम तेलात दोन्ही बाजूने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. या पद्धतीने तुम्ही झटपट आणि चमचमीत Potato Bites तयार करू शकता.

logo
marathi.freepressjournal.in