
रोज रोज तेच तेच पोहे खाऊन आपण सगळेच कंटाळतो. म्हणून आज आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी या पोहयनपासून बनणारी झटपट रेसिपी- 'पोहे पकोडे'. हे अगदी मोजक्या साहित्यात तुम्ही बनवू शकता. सकाळच्या धावपळीत किंवा संध्याकाळी दमून घरी आल्यानंतर ही असे झटपट बनणारे पदार्थ कोणत्याही लाइफसेव्हर पेक्षा कमी नाहीत. चला तर मग जाणून घेऊया ही झटपट बनणारी पोहा पकोडा रेसिपी...
१ कप पोहे
२ उकडलेले बटाटे
१ कांदा (बारीक चिरलेला)
१ कप बेसन
२-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
चाट मसाला (चवीनुसार)
मीठ (चवीनुसार)
भाजलेले शेंगदाणे
तेल (तळण्यासाठी)
सर्वात आधी पोहे नीट धुवून पाणी निथळून घ्या. उकडलेले बटाटे मॅश करून त्यात धुतलेले पोहे मिसळा. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे, चाट मसाला आणि मीठ घालून सर्व साहित्य चांगले एकत्र करा. हळूहळू बेसन घालून मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत मिक्स करा. गॅसवर पॅन गरम करा, त्यात तेल टाका आणि मिश्रणाचे लहान गोल पकोडे करून तेलात हळूहळू तळा. आच मंद ठेवा जेणेकरून पकोडे आतून शिजून बाहेरून सोनेरी आणि कुरकुरीत होतील. सोनेरी तपकिरी झाले की पकोडे तेलातून काढा आणि गरम गरम चहा सोबत सर्व्ह करा.