थंडीमध्ये आरोग्याची काळजी! घरीच बनवा गरमागरम पौष्टिक नाचणीचे सूप

हिवाळ्याच्या दिवसांत सर्दी, खोकला किंवा तापामुळे अनेकदा भूक लागत नाही. शरीर थकलेलं वाटतं आणि ऊर्जा कमी होते. अशावेळी जड अन्न न खाता हलकं, गरम आणि पौष्टिक काहीतरी घेणं फायदेशीर ठरतं. अशाच वेळी नाचणीचं सूप हा एक उत्तम पर्याय आहे.
थंडीमध्ये आरोग्याची काळजी! घरीच बनवा गरमागरम पौष्टिक नाचणीचे सूप
थंडीमध्ये आरोग्याची काळजी! घरीच बनवा गरमागरम पौष्टिक नाचणीचे सूप
Published on

नाचणीमध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, लोह आणि इतर आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही नाचणीचा आहार फायदेशीर मानला जातो. थंडीमध्ये शरीराला उष्णता देणारं आणि पचायला हलकं असलेलं हे सूप आजारी व्यक्तीसाठीही उत्तम आहे.

चला तर जाणून घेऊया, घरी अगदी सोप्या पद्धतीने नाचणीचं सूप कसं बनवायचं.

साहित्य

  • नाचणीचे पीठ

  • शिमला मिरची

  • कांद्याची पात

  • कोबी

थंडीमध्ये आरोग्याची काळजी! घरीच बनवा गरमागरम पौष्टिक नाचणीचे सूप
हिवाळ्यात जेवणाचा स्वाद दुप्पट करेल 'ही' आंबट-गोड आवळा चटणी, पाहा सोपी रेसिपी
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • बारीक चिरलेलं आलं-लसूण

  • सोया सॉस

  • टोमॅटो सॉस

  • काळी मिरी पावडर

  • तेल

  • मीठ (चवीनुसार)

थंडीमध्ये आरोग्याची काळजी! घरीच बनवा गरमागरम पौष्टिक नाचणीचे सूप
१० मिनिटांत बनवा कणीक-बटाट्याचे हेल्दी पॅनकेक! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच होतील खुश

कृती

नाचणीचं सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत थोडंसं तेल घालून ते गरम करा. त्यात दोन चमचे नाचणीचं पीठ टाकून मंद आचेवर सतत हलवत छान भाजून घ्या, म्हणजे कच्चेपणा राहणार नाही. पीठ भाजून झाल्यावर ते बाजूला काढा. त्याच कढईत पुन्हा थोडं तेल घालून बारीक चिरलेलं आलं-लसूण परतून घ्या. त्यानंतर त्यात कोबी, कांद्याची पात, शिमला मिरची आणि हिरवी मिरची घालून भाज्या थोड्या मऊ होईपर्यंत परतून घ्या. आता भाजलेलं नाचणीचं पीठ पाण्यात मिसळून गाठी न पडता पेस्ट तयार करा आणि ती कढईत ओता. आवश्यकतेनुसार पाणी घालून सूप नीट ढवळा. सूपला उकळी आली की त्यात काळी मिरी पावडर, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस घाला. शेवटी चवीनुसार मीठ टाकून सूप आणखी दोन-तीन मिनिटे उकळू द्या. गरमागरम आणि पौष्टिक नाचणीचं सूप तयार आहे.

थंडीमध्ये शरीराला उब देणारं, हलकं आणि आरोग्यासाठी लाभदायक असलेलं हे सूप नक्की करून पाहा. आजारपणात किंवा रोजच्या आहारातही हे सूप उत्तम पर्याय ठरू शकतं.

logo
marathi.freepressjournal.in