काय सांगता, रसगुल्ला खाल्ल्याने 'हे' आजार मूळापासून नष्ट होतात?

ज्या लोकांना वारंवार शरीरात जळजळ होण्याचा त्रास होतो, त्यांच्यासाठी रसगुल्ला...
काय सांगता, रसगुल्ला खाल्ल्याने 'हे' आजार मूळापासून नष्ट होतात?
Published on

गोड खाण्याची आवड आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच असते. गोड खायला मिळालं की मन प्रसन्न होतं, आणि बंगाली मिठाई म्हटलं की रसगुल्ल्याचं नाव हमखास पुढे येतं. पण तुम्हाला माहिती आहे का, हा पांढराशुभ्र रसगुल्ला फक्त चवीला नाही तर आरोग्यासाठीही वरदान ठरू शकतो? होय, अगदी खरं! रसगुल्ला खाल्ल्याने काही आजारांपासून सुटका मिळते आणि शरीराला चांगले पोषणही मिळते.

बऱ्याचजणांना डोळ्यांमध्ये जळजळ होणं, डोळे पिवळसर दिसणं अशा समस्या अनेकदा भेडसावतात. अशावेळी दररोज एक रसगुल्ला खाल्ल्याने डोळ्यांची जळजळ कमी होते आणि दृष्टी सुधारण्यास मदत मिळते.

याशिवाय ज्या लोकांना वारंवार शरीरात जळजळ होण्याचा त्रास होतो, त्यांच्यासाठीही रसगुल्ला एक उत्तम उपाय आहे. छेना (पनीर) पासून बनणाऱ्या या मिठाईत कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि शरीराची ताकद वाढते.

काय सांगता, रसगुल्ला खाल्ल्याने 'हे' आजार मूळापासून नष्ट होतात?
महिलांसाठी सुपरफूड! आताच जाणून घ्या कसुरी मेथीचे हे ५ जबरदस्त फायदे

पौष्टिक मूल्याच्या दृष्टीनेही रसगुल्ला समृद्ध आहे. 100 ग्रॅम रसगुल्ल्यात तब्बल 186 कॅलरीज असतात. त्यात 153 कॅलरीज कार्बोहायड्रेट्समधून, 17 कॅलरीज फॅटमधून आणि 16 कॅलरीज प्रथिनांमधून मिळतात. म्हणजेच हा गोड पदार्थ चवदार असूनही शरीरासाठी उपयुक्त पोषण देतो.

एकूणच काय, रसगुल्ला फक्त चवीसाठी नव्हे तर डोळ्यांचे आरोग्य, शरीरातील कॅल्शियमची कमतरता आणि जळजळ यांसारख्या त्रासांवरही उपयुक्त ठरतो. त्यामुळे पुढच्या वेळी गोड खायची इच्छा झाली, तर निर्धास्तपणे रसगुल्ल्याचा आस्वाद घ्या!

(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in