गरोदरपणात समांथा रुथ प्रभूची उडाली झोप; 'इन्सोम्निया' म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या कारणं आणि उपाय

प्रेग्नन्सीदरम्यान झोप न लागणे म्हणजेच इन्सोम्निया का होतो? समंथा रुथ प्रभूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या अनुभवाच्या निमित्ताने जाणून घ्या या समस्येमागची कारणं, लक्षणं आणि सोपे उपाय.
गरोदरपणात समांथा रुथ प्रभूची उडाली झोप; 'इन्सोम्निया' म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या कारणं आणि उपाय
गरोदरपणात समांथा रुथ प्रभूची उडाली झोप; 'इन्सोम्निया' म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या कारणं आणि उपाय
Published on

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या आयुष्यातील नव्या टप्प्याचा आनंद घेत आहे. पती राज निदिमोरूसोबत पहिल्या बाळाच्या स्वागताची तयारी करत असलेल्या समांथाने सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नन्सी जर्नीचा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहेत. मात्र यावेळी तिने गोंडस फोटो किंवा बेबी अपडेट नाही, तर अनेक गर्भवती महिलांना भेडसावणाऱ्या एका सामान्य समस्येबद्दल खुलासा केला आहे.

समांथाने इन्स्टाग्राम स्टोरीवर जिमला जातानाचा सेल्फी शेअर करत "Insomnia is so much fun. But we go to Zym" असे लिहिले. म्हणजेच, झोप न लागण्याचा त्रास होत असतानाही ती नियमित जिमला जात असल्याचे तिने विनोदी अंदाजात सांगितले. तिच्या या पोस्टनंतर 'प्रेग्नन्सी इन्सोम्निया' म्हणजेच गर्भधारणेदरम्यान झोप न लागण्याच्या समस्येची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

समांथा रुथ प्रभू इंस्टाग्राम स्टोरी

प्रेग्नन्सीमध्ये झोप का उडते?

गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे अनेक महिलांना रात्री शांत झोप लागत नाही. तज्ज्ञांच्या मते, जवळपास ३८ टक्के गर्भवती महिलांना गर्भधारणेच्या काळात झोपेच्या समस्या जाणवतात.

यामागील प्रमुख कारणे अशी आहेत:

  • हार्मोन्समधील बदल - प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या हार्मोन्समध्ये होणारे बदल झोपेचे चक्र बिघडवू शकतात.

  • वारंवार लघवीला जाणे - गर्भाशयाचा मूत्राशयावर दबाव वाढल्याने रात्री अनेकदा उठावे लागते.

  • शारीरिक अस्वस्थता - वाढते पोट, पाठदुखी, पायात गोळे येणे किंवा शरीरातील वेदना यामुळे झोपेत व्यत्यय येतो.

  • मानसिक ताण - बाळाची काळजी, प्रसूतीची भीती किंवा आर्थिक चिंता यामुळे मन शांत राहत नाही.

  • ॲसिडिटी आणि अपचन - गर्भधारणेत पचनाच्या तक्रारी वाढल्याने रात्री आरामदायी झोप लागत नाही.

झोप चांगली यावी यासाठी काय करावे?

काही छोट्या सवयी बदलल्यास झोपेचा दर्जा सुधारू शकतो.

  • शक्यतो डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे बाळाला रक्तपुरवठा चांगला होण्यास मदत होते.

  • गुडघ्यांच्या मध्ये आणि पोटाखाली उशी ठेवून झोपल्यास शरीरावरील ताण कमी होतो.

  • झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी पाणी कमी प्या, त्यामुळे रात्री वारंवार उठावे लागणार नाही.

  • संध्याकाळनंतर कॅफिनयुक्त पेये, जड किंवा तिखट पदार्थ टाळा.

  • झोप येत नसेल तर २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ अंथरुणात पडून राहू नका. त्याऐवजी पुस्तक वाचणे, हलके संगीत ऐकणे किंवा शांत बसणे फायदेशीर ठरू शकते.

  • खोलीचे तापमान थंड आणि आरामदायी ठेवा. त्यामुळे शरीराला लवकर झोप लागण्यास मदत होते.

गरोदरपणात समांथा रुथ प्रभूची उडाली झोप; 'इन्सोम्निया' म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या कारणं आणि उपाय
आलिया भट्टच्या चमकदार त्वचेचं सीक्रेट! गूळ-तूपासोबत 'हा' घरगुती स्नॅक देतो नैसर्गिक ग्लो

समांथाची पोस्ट का ठरली चर्चेचा विषय?

प्रेग्नन्सीदरम्यान अनेक सेलिब्रिटी फक्त आनंदाचे क्षण शेअर करतात. मात्र समांथाने झोप न लागण्यासारख्या सामान्य पण त्रासदायक समस्येबद्दल खुलेपणाने बोलत, त्यावर विनोदही केला. त्यामुळे अनेक गर्भवती महिलांनी तिच्या पोस्टशी स्वतःला जोडून घेतले. प्रेग्नन्सीमध्ये अशा समस्या सामान्य असल्या तरी त्या सतत जाणवत असतील किंवा झोपेचा त्रास वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

(टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. नवशक्ती कोणताही वैद्यकीय दावा करत नाही. कोणताही उपाय अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in